Download App

Jagun Ghe Zara: बाप्पाचे दर्शन घेत ‘जगून घे जरा’ चित्रपटाची घोषणा

  • Written By: Last Updated:

Jagun Ghe Zara: ‘जगून घे जरा’ (Marathi Movie) या मराठी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित (Directed by Swapna Waghmare Joshi) या सिनेमाचे लेखन शिरीष लाटकर यांनी केले आहे. तर या सिनेमात राकेश बापट आणि सिद्धी म्हांबरे हे कलाकार हटक्या अंदाजात बघायला मिळणार आहेत. सिद्धी म्हांबरेच्या निमित्ताने मराठी मनोरंजनसृष्टीला (Entertainment) एक नवीन चेहरा बघायला मिळाला आहे.

सिनेमातील गाण्यांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचे संगीत लाभले आहे. त्यानिमित्त नुकतेच लालबाग राजा गणेशाचे दर्शन घेऊन ‘जगून घे जरा’ या सिनेमाच्या टीमने हजेरी लावली आहे. तसेच यावेळी बाप्पाचा आशीर्वाद घेत सिनेमाच्या पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे यांनी सांगितले आहे की, ‘आज गणेशोत्सवानिमित्त ‘जगून घे जरा’ या सिनेमाची घोषणा आम्ही करत आहोत.

या सिनेमात राकेश आणि सिद्धी यांची धमाकेदार फ्रेश जोडी या सिनेमात बघायला मिळणार आहे. या सिनेमाची कथा रोमँटिक, प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणारी आहे. ‘जगून घे जरा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी देखील सांगितले आहे की, ‘महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाचा आशीर्वाद घ्यायला आम्हीओ सर्वजण या ठिकाणी पोहचलो आहे. आज लालबागच्या राजाच्या चरणी आम्ही ‘जगून घे जरा’ या सिनेमाचे पोस्टरचे प्रदर्शित केले, याचे मनाला खूप समाधान वाटते.

लवकरच अवतरणार लावणी किंग आशिष पाटील यांची ‘सुंदरा’

‘जगून घे जरा’ ही एक अनोखी संवेदनशील अशी प्रेमकथा असणार आहे. जसे सर्वांचे बाप्पाबरोबर भावनिक नाते आहे, तसाच हा सिनेमा देखील भावनांवर आणि नात्यांवर भाष्य करणार आहे. लवकरच सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. तसेच ८८ फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी, हार्दिक गज्जर फिल्म्स यांच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या या मराठी सिनेमाच्या संकलनाची जबाबदारी क्षितिजा खंडागळे यांनी केले आहे, तर हृषिकेष गांधी यांचे छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे.

Tags

follow us