लवकरच अवतरणार लावणी किंग आशिष पाटील यांची ‘सुंदरा’

लवकरच अवतरणार लावणी किंग आशिष पाटील यांची ‘सुंदरा’

Aashish Patil : महाराष्ट्राचं लोकनृत्य असलेल्या लावणीमध्ये केवळ महिलाच नाही तर कित्येक पुरूष देखील लावणीमध्ये आपलं स्थान निर्माण करून आहेत. त्यात महाराष्ट्राचे लावणी किंग अशी ओळख असणारे नृत्यकार आशिष पाटील यांच्या बहारदार लावणीचा म्युझिक व्हिडीओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सुंदरा’ असं या म्युझिक व्हिडीओ नाव आहे. त्याचा प्रोमो देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

World Cup 2023: विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ जाहीर, तमीम इक्बालला डच्चू

आशिष पाटील यांचा हा पहिलावहिला म्युझिक व्हिडीओ आहे. त्यामध्ये गाण्याचे दिग्दर्शन, नृत्यदिग्दर्शन आणि सादरकरण देखील स्वतः आशिष पाटील यांनी केले आहे. तसेच त्यांच्यासोबत गिरिजा गुप्ते यांनी देखील या गाण्याची निर्मिती केली आहे. तर गाणं अवधूत गुप्ते यांनी गायलं आहे. तर प्रवीण कुमार यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. तसेच गाण्याचे गीतकार मंदार चोळकर हे आहेत. एकवीरा म्युझाक प्रस्तुत या गाण्याचे छायाचित्रण हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे.

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत केव्हा होणार प्रभु श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा, काय असणार खास? जाणून घ्या…

या गाण्याबद्दल बोलताना आशिष पाटील म्हणाले की, ‘बाप्पाचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी ‘सुंदरी’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलो आहे. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना हे गाणं आणि नृत्य आवडेल. आतापर्यंत देखईल मी प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच इथपर्यंत पोहचू शकलो.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube