Ayodhya Ram Mandir : अयोध्येत केव्हा होणार प्रभु श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा, काय असणार खास? जाणून घ्या…
Ayodhya Ram Mandir : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रभु श्रीरामांच्या जन्मभूमी अयोध्येमध्ये श्रीराम मंदीराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. येत्या डिसेंबरपर्यंत हे मंदिर पूर्ण होण्याची शक्यता असून जानेवारी 2024 मध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ते 24 जानेवारी दरम्यान कोणत्याही दिवशी संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत आहे.
भारत माता की जय…बावनकुळेंनी थांबवलं, मोदी मोदी म्हणा…बावनकुळेंच्या भोवती नवा वाद !
केव्हा होणार प्रभु श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा?
राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी एका मुलाखतीत माहिती दिली की, 20 ते 24 जानेवारी 2024 च्या दरम्यान कोणत्याही दिवशी राम मंदिरामध्ये प्रभु श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी सहभागी होऊ शकतात. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून त्याची अंतिम तरिख निश्चित झालेली नाही.
डॉन अरुण गवळीची संचित रजा मंजूर, 28 दिवसांसाठी कारागृहाबाहेर
श्रा राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात प्रभु श्रीरामांची मूर्ति मंदिराच्या गर्भगृहात स्थापन केली जाईल. 14 जानेवारीला संक्रांत झाली की, 10 दिवसांचा हा कार्यक्रम असणार आहे. तसेच कार्यक्रमानंतर कदाचित 24 जानेवारीला भाविकांसाठी मंदिर खुल होईल असं देखील राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी जूनमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे आता भाविकांना प्रभु श्रीरामांच्या दर्शनाची ओढ लागली आहे.
या खास उपकरणाने प्रभु श्रीरामांच्या माथ्यावर पडणार सुर्य किरणं…
मिश्रा यांनी हे सांगितले की, मंदिराच्या शिखरावर एक उपकरण बसवण्याचं काम सुरू आहे. ज्याद्वारे प्रत्येक वर्षी राम नवमीच्या दिवशी मंदिराच्या गर्भगृहात प्रभु श्रीरामांच्या माथ्यावर सुर्य किरणं पडणार आहेत. हे उपकरण बंगळुरूमध्ये बनवलं जात आहे. त्यासाठी पुण्याच्या एका संस्था आणि रूडकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इंस्टीट्युट एकत्रित काम करत आहेत.