डॉन अरुण गवळीची संचित रजा मंजूर, 28 दिवसांसाठी कारागृहाबाहेर

डॉन अरुण गवळीची संचित रजा मंजूर, 28 दिवसांसाठी कारागृहाबाहेर

Don Arun Gawli : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला (Arun Gawli) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) मंगळवारी 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि वाल्मिकी मिनेझिस यांनी हा निर्णय दिला.

सुरुवातीला गवळीने संजित रजेसाठी कारागृह उपमहानिरीक्षकांकडे अर्ज केला होता. पण गवळी गुन्हेगारांच्या टोळीचा म्होरक्या असून त्याची रजेवर सुटका झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गवळीचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. त्यानंतर गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

भाजप नेते शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा झटका, लीलावती रुग्णालयात दाखल

गवळीने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की कारागृह उपमहानिरीक्षकांचा निर्णय अवैध आहे. यापूर्वी रजेवर सुटल्यानंतर कायदे व नियमांचे काटेकोर पालन केले होते. परिणामी, यावेळीही रजा नाकारता येणार नाही. असे त्याने सांगितले होते.

न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता त्याची याचिका मंजूर केली आहे. गवळीला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीतर्फे अॅड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली.
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार: पोलिसांकडून रॅलीवर लाठीचार्ज, 30 हून अधिक विद्यार्थी जखमी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube