भाजप नेते शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा झटका, लीलावती रुग्णालयात दाखल
Shahnawaz Hussain Heart Attack: भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसैन (Shahnawaz Hussain) यांना आज हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले. दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांना रुग्णालयात आणण्यात आले.
लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर जलील पारकर यांनी सांगितले की, शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराच्या झटक्याने दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. हुसैन सध्या आयसीयूमध्ये दाखल आहेत.
हुसैन यांना याआधी ऑगस्टमध्ये आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता.
कोण आहेत शाहनवाज हुसैन?
भाजप नेते शाहनवाज हुसैन यांचा जन्म 12 डिसेंबर 1968 रोजी बिहारमधील सुपौल येथे झाला. सध्या ते पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. हुसैन हे नितीशकुमार आणि एनडीए सरकारमध्ये उद्योगमंत्री होते, पण नंतर सरकार पडले.
BJP leader Shahnawaz Hussain suffered cardiac arrest and was admitted to Lilavati Hospital in Mumbai, earlier this evening.
(file picture) pic.twitter.com/ZoJGezSIDw
— ANI (@ANI) September 26, 2023
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार: पोलिसांकडून रॅलीवर लाठीचार्ज, 30 हून अधिक विद्यार्थी जखमी
शाहनवाज यांचे भाषण ऐकून अटलबिहारी वाजपेयी प्रभावित झाले
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 1997 मध्ये शाहनवाज हुसैन यांना एका कार्यक्रमात बोलताना ऐकले होते. मग ते म्हणाले हा मुलगा खूप छान बोलतो. जर याला संसदेत पाठवले तर बड्या नेत्यांची सुट्टी करील.
2005 मध्ये कटिहारमधून आमदार निवडून आले
फेब्रुवारी 2005 मध्ये शाहनवाज हुसैन हे कटिहारमधून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2010 साली ते आमदारही झाले. 1999 मध्ये ते राज्यमंत्री झाले. त्याच वेळी, 2001 मध्ये ते सर्वात तरुण केंद्रीय मंत्री बनले. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. हुसैन यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.