Download App

The Kerala Story : महाराष्ट्रात ‘द केरला स्टोरी’ मोफत दाखवणाऱ्यांबद्दल केदार शिंदेंनी सुनावले; म्हणाले, ‘या नेत्यांना…’

Kedar Shinde On The Kerala Story : केदार शिंदेंचा (Kedar Shinde) ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) हा चित्रपट गेल्या काही दिवसापासून चाहत्यांच्या भेटीला आला असून हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. त्याच दरम्यान ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला आहे. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत आहेत.

आता महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र शाहीर’ प्रदर्शित झाला होता. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? असा प्रश्न करत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुनावलं आहे. ‘द केरळा स्टोरी’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ हे दोन्ही चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आमने-सामने आले आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचं, कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. तर ‘द केरळा स्टोरी’ या चित्रपटाला एकीकडे विरोध होत आहे.

रिलीज होण्याअगोदरच या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. तर दुसरीकडे या चित्रपटाच्या कथानकाने चाहते देखील मोठ्या प्रमाणात भारावले आहेत. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे मोफत शो आयोजित केले जात आहेत. राज्यातील नेते ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे खास शो आयोजित करत आहेत. यामुळे ‘महाराष्ट्र शाहीर’चे दिग्दर्शक केदार शिंदे चांगलच संतापले असल्याचे दिसून येत आहेत.

त्यांनी ट्वीट करत ते म्हणाले,”दुर्दैव… महाराष्ट्र राज्यात ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते मंडळी आयोजित करुन लोकांना मोफत दाखवत आहेत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र शाहीर’ प्रदर्शित करण्यात आला. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?. असा प्रश्न त्यांनी यावेळी केला आहे.

तामिळनाडूत ‘द केरळ स्टोरी’ बॉयकॉट, मल्टिप्लेक्स संघटनांचा निर्णय

केदार शिंदे यांच्या ट्वीटनंतर ‘महाराष्ट्र शाहीर’ विरुद्ध ‘द केरळ स्टोरी’ असा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केदार शिंदे यांच्या ट्वीटवर ‘खरचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राला आज हे दिवस पाहायला लागत आहेत. या दोन्ही चित्रपटाची तुलना होऊच शकत नाही. स्वतःच्या आजोबांच्या चित्रपटासाठी तुम्ही आग्रही असणं समजू शकतो. पण म्हणून ज्वलंत आणि महत्त्वाच्या ‘द केरळ स्टोरी’ला विरोध करणं हा स्वार्थीपणा आहे, अशा संमिश्र ट्वीट चाहत्यांनी यावेळी केले आहेत.

‘द केरळा स्टोरी’ या चित्रपटाच्या रिलीजच्या पहिल्या दिवशी ८.५ कोटींची कमाई झाली आहे. तर दुसऱ्या दिवशी ११.२२ कोटींची कमाई केली. आणि तिसऱ्या दिवशी १६.५० कोटींची कमाई झाली आहे. एकंदरीत आतापर्यंत या चित्रपटाचे ३५.७५ कोटींचा गल्ला केला आहे. लवकरच हा सिनेमा १०० कोटींच्या कल्बमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us