तामिळनाडूत ‘द केरळ स्टोरी’ बॉयकॉट, मल्टिप्लेक्स संघटनांचा निर्णय

तामिळनाडूत ‘द केरळ स्टोरी’ बॉयकॉट, मल्टिप्लेक्स संघटनांचा निर्णय

Boycott The Kerala Story : बॉलीवूड चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यापासून देशभरात मोठी चर्चा आणि वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात केरळमधील मुलींना धर्मांतर करून त्यांना ISIS मध्ये सामील करण्यास भाग पाडले जात असल्याची कथा दाखवल्याचा दावा करण्यात आला आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच ‘द केरळ स्टोरी’वर बराच वाद झाला होता आणि त्यावर बंदी घालण्याची मागणी होत होती.

मात्र, हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवरही जोरदार व्यवसाय करत आहे. आतापर्यंत, चित्रपटाचे भारतातील कलेक्शन दोन दिवसांत जवळपास 20 कोटी रुपयांवर पोहोचले आहे आणि तो स्लीपर हिट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण आता ‘द केरळ स्टोरी’ पुन्हा एकदा वादात सापडला आहे. तामिळनाडूच्या मल्टिप्लेक्स असोसिएशनने चित्रपटगृहात चित्रपट दाखवण्यास नकार दिला आहे.

DC vs RCB : फिल सॉल्टची झंझावाती खेळी, दिल्लीचा RCB वर 7 गडी राखून दणदणीत विजय

माहितीनुसार, तमिळनाडू मल्टिप्लेक्स असोसिएशनने घोषणा केली आहे की ‘द केरळ स्टोरी’चे प्रदर्शन रविवारपासून राज्यभरात बंद करण्यात येणार आहे. या निर्णयामागचे कारण स्पष्ट करताना असोसिएशनने म्हटले आहे की हा चित्रपट ‘कायदा आणि सुव्यवस्थेला धोका’ ठरू शकतो. यासोबतच या निर्णयामागे सर्वसामान्यांकडून चित्रपटाला मिळालेला थंड प्रतिसाद हेही कारण असल्याचे सांगण्यात आले.

तमिळनाडूतील अनेक राजकीय संघटनांनीही हा चित्रपट कोणत्याही सिनेमागृहात दाखविल्यास ते बंद करण्यात येईल, अशी धमकी दिली आहे. तामिळनाडूच्या नाम तमिलार कच्ची (NTK) पक्षानेही शनिवारी चेन्नईमध्ये ‘द केरळ स्टोरी’च्या रिलीजला विरोध केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या संघटनेचे व्यवस्थापक, अभिनेता-दिग्दर्शक सीमान यांच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या अण्णा नगरमध्ये चित्रपटाविरोधात निदर्शने केली.

‘हे तर महाराष्ट्राचे वैरी, बाळासाहेब असते तर’.. शिंदेंच्या कर्नाटक दौऱ्यावर राऊतांची आगपाखड

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहांच्या आतही निदर्शने केली आणि पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यापूर्वी सीमानने या चित्रपटाला विरोध करणार असल्याचे जाहीर केले होते. ‘द केरळ स्टोरी’ एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात असल्याचा दावा त्यांनी केला. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी तामिळनाडू सरकारकडे केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube