DC vs RCB : फिल सॉल्टची झंझावाती खेळी, दिल्लीचा RCB वर 7 गडी राखून दणदणीत विजय
DC vs RCB : आयपीएल 2023 च्या ब्लॉकबस्टर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव केला. 6 मे (शनिवार) रोजी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने दिल्लीला विजयासाठी 182 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी 17 व्या षटकात पूर्ण केले. इंग्लिश फलंदाज फिल सॉल्ट दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा हिरो ठरला. फिल सॉल्टने 87 धावांची तुफानी खेळी खेळली.
यादरम्यान सॉल्टने 45 चेंडूंचा सामना केला आणि आठ चौकारांशिवाय सहा षटकार ठोकले. चालू मोसमातील दिल्ली कॅपिटल्सचा हा चौथा विजय आहे. या विजयामुळे ती आता गुणतालिकेत नवव्या स्थानावर आली आहे. आरसीबीने 10 पैकी पाच सामने जिंकले असून ते पाचव्या क्रमांकावर कायम आहेत.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची झंझावाती सुरुवात झाली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि फिल सॉल्ट यांनी 31 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली. जोस हेझलवूडने वॉर्नरची विकेट घेत ही धोकादायक भागीदारी संपुष्टात आणली. वॉर्नरने 14 चेंडूत 22 धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि एक षटकार लगावला. डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यानंतरही आरसीबीच्या अडचणी कमी झाल्या नाहीत कारण मिचेल मार्श आणि फिल सॉल्ट यांनी दुसऱ्या विकेटसाठी 59 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
मार्शने 17 चेंडूत 26 धावा केल्या. मार्श बाद झाला तेव्हा दिल्लीची धावसंख्या 10.3 षटकांत 2 बाद 119 अशी होती. मार्श बाद झाल्यानंतर रिले रोसोने आघाडी घेतली. रोसो-सॉल्ट यांनी 52 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे आरसीबी सामान्यांवरील पकड कमी झाली. रोसोने 22 चेंडूंचा सामना करत नाबाद 35 (तीन षटकार, एक चौकार) धावा केल्या.
‘मी मुख्यमंत्री कसा होतो, हे कोणी सांगण्याची आणि लिहण्याची गरज नाही’
कोहली-लोमरर यांनी अर्धशतक केले
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसने विराट कोहलीसोबत 10.3 षटकांत 82 धावांची भागीदारी केली. मिचेल मार्शने फाफ डू प्लेसिसला बाद करून ही भागीदारी मोडली. डु प्लेसिसने 32 चेंडूंचा सामना करत 45 धावा केल्या, ज्यात पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मार्शने ग्लेन मॅक्सवेलची मोठी विकेट घेतली.
दोन विकेट पडल्यानंतर कोहली आणि महिपाल लोमरोर यांच्यात 55 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. कोहलीने 46 चेंडूत पाच चौकारांसह 55 धावा केल्या. कोहलीला खलील अहमदच्या हातून मुकेश कुमारने झेलबाद केले. या खेळीत कोहलीने आयपीएलमधील सात हजार धावाही पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये सात हजार धावा करणारा कोहली पहिला फलंदाज ठरला आहे.
तुम्ही फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्या; भुजबळांनी राज ठाकरेंना फटकारले !
कोहली बाद झाल्यानंतर महिपाल लोमरोरने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. लोमरने आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावताना नाबाद 54 धावा केल्या. यादरम्यान लोमररने 29 चेंडूंचा सामना केला आणि सहा चौकारांव्यतिरिक्त तीन षटकार ठोकले. लोमरोर-कोहलीच्या शानदार खेळीमुळे आरसीबी संघाला चार विकेट्सच्या मोबदल्यात 181 धावा करता आल्या.