‘मी मुख्यमंत्री कसा होतो, हे कोणी सांगण्याची आणि लिहण्याची गरज नाही’
Uddhav Thackeray on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोक माझे सांगती या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यपद्धतीविषयी नापसंती व्यक्त केली होती. शरद पवारांनी लिहिलं उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या टीकेला महाड येथील जाहीर सभेतून प्रत्युत्तार दिले आहे. मी राज्याचं नेतृत्व कसं केलं? काय केलं? हे जगजाहीर आहे. मला कुठं लिहिण्याची किंवा बोलण्याची गरज नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना फक्त दोनवेळा मंत्रालयात गेले. ही बाब आमच्या फारशी पचनी पडणारी नव्हती, असे शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. शरद पवार यांच्या आरोपांना आज उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेतून उत्तर दिले आहे.
अजित पवारांचा उद्धटपणा पाहूनच शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला; राज ठाकरेंचं धक्कादायक विधान
उद्धव ठाकरे म्हणाले की मी मुख्यमंत्री कसा होतो हे कोणी सांगण्याची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे. मला तुमच्या कुटुंबापैकी एक मानता यापलिकडे माझी कमाई काय आहे. मी राज्याचं नेतृत्व कसं केलं? काय केलं? हे जगजाहीर आहे. मला कुठं लिहिण्याची किंवा बोलण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
निवडणुकीत जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला पाहिजे. पंतप्रधानांनी 100 वेळा मन की बात केली. 100 वेळा बोलले म्हणजे सचिन तेंडूलकरच्या सेंचुरीची मजा येत नाही. जनतेच्या मन की बात होती का? 2014 साली काय बोलले होते ते त्यांनी खरं केलं आहे? महागाई कमी केली? नोकऱ्या मिळाल्या? उज्वला योजना मिळते का? त्यांनी केलेल्या घोषणा देखील आपण विसरुन गेलो. कोणी प्रश्न विचारला तर त्याला देशद्रोही ठरवून आतमध्ये टाकायचे. निवडणुका आल्या की जातीय दंगली भडकवायच्या. हिंदू-मुस्लिम वाद लावायचे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर केली.