चित्रपट, वेब शो आणि आता मालिका! मालिका विश्वात दिग्दर्शक, निर्माता अभिनेता आदिनाथ कोठारेच पदार्पण

Adinath Kothare : दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) सध्या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन

Adinath Kothare

Adinath Kothare

Adinath Kothare : दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) सध्या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन करतोय असं म्हणायला हरकत नाही पण तो या वेळी प्रेक्षकांचं थोड हटके पद्धतीने मनोरंजन करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय.

रुपेरी पडद्यावर दमदार प्रोजेक्ट्स करून आता आदिनाथ पहिल्यांदाच एका मालिकेचा भाग होताना दिसणार आहे. स्टार प्रवाह सारख्या चॅनलसाठी आदिनाथ नवीन मालिका करणार आहे. गंमत म्हणजे या मालिकेचा निर्मता आणि अभिनेता अश्या दुहेरी भूमिका तो यात साकारणार असल्याचं कळतंय.

नशीबवान असं या मालिकेचं नाव असून आदिनाथ रुद्रप्रताप घोरपडे ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. आदिनाथसाठी ही मालिका आणि हा रोल का खास आहे हे सांगताना तो सांगतो ” आजवर अनेक मलिकासाठी कधीतरी निर्माता, दिग्दर्शक झालो होतो पण अभिनेता म्हणून ही माझी पहिली मालिका आहे. चित्रपट, ओटीटी माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणं आणि आता रोज प्रेक्षकांना आपण भेटणार ही भावना खरंच कमाल आहे.

रक्तरंजित लव्ह मॅरेज! गर्भवती पत्नीची हत्या, मृतदेह ब्लेडने कापला; नदीत हात,पाय,डोके फेकले अन् धड घरात ठेवलं

माझा पहिला वहिला सीरियल डेब्यू असला तरी मालिकेच्या मागची बाजू मी अनेकदा अनुभवली आहे पण आता अभिनेता म्हणून ही बाजू अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझ्या नशिबाने दिलेली ही एक नशीबवान संधी आहे असं म्हणायला हरकत नाही” आदिनाथ सध्या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार तर आहे पण सोबतीला तो मराठी सोबतच बॉलिवूड मधल्या बड्या चित्रपटात देखील दिसणार आहे.

Exit mobile version