Director Swapnil Mayekar passes away : उद्या 5 मे ला लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांचा मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र या दरम्यान एक दुखःद बातमी समोर आली आहे. चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांचे दु:खद निधन झाले आहे. गेले काही महिने ते आजारी होते. हा त्यांचा स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा होता. या बातमीने चित्रपटातील कास्टसह सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट खानदेशातील शेतकरी कुटुंबातील जन्मलेल्या तरूणाची ही कथा आहे. तो कसा मुंबईत व्यावसायिक बनण्यासाठी अन्यायाशी दोन हात करतो, त्याची ही संघर्षकथा आहे. दरम्यान या चित्रपटाची आणखी एक खासियत अशी आहे की, या चित्रपटातून मिळणारा निव्वळ नफा समाजकार्यासाठी दान करण्यात येणार आहे.
Rajesh khale : सिनेमॅटोग्राफर राजेश खळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
या चित्रपटातील कलाकारंबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये 83 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये झळकलेला अभिनेता चिराग पाटील आणि सिद्धी पाटणे हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. तर अकात फिल्म्सचे चंद्रकांत विसपुते हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. समीर खोले हे संगीत दिग्दर्शक आणि स्वप्निल मयेकर हे या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक आहेत.