Ghoomer Movie: दिव्यांगांनीही पाहिला ‘घूमर’, चिमुकल्यांची अभिषेक, सैयामीशी मस्ती

Ghoomer Movie: क्रिकेटवर आधारित असलेल्या घूमर चित्रपटाचे विशेष शो ही आयोजित करण्यात येत आहेत. आशा प्रॉडक्शन आणि भामला फाऊंडेशन यांनी एकत्र येऊन खास दिव्यांग मुलांसाठी ‘घूमर’ चा शो आयोजित करण्यात आला होता. या मुलांनी चित्रपट तर पाहिलेच पण अभिषेक बच्चन, सैयामी खेर व इतरांशी संवाद साधला. कलाकार व चिमुकले यांनी जोरदार दंगा, मस्ती केल्याचे पाहिले […]

Ghoomer Film 11

Ghoomer Film 11

Ghoomer Movie: क्रिकेटवर आधारित असलेल्या घूमर चित्रपटाचे विशेष शो ही आयोजित करण्यात येत आहेत. आशा प्रॉडक्शन आणि भामला फाऊंडेशन यांनी एकत्र येऊन खास दिव्यांग मुलांसाठी ‘घूमर’ चा शो आयोजित करण्यात आला होता. या मुलांनी चित्रपट तर पाहिलेच पण अभिषेक बच्चन, सैयामी खेर व इतरांशी संवाद साधला. कलाकार व चिमुकले यांनी जोरदार दंगा, मस्ती केल्याचे पाहिले गेले होते. काही चिमुकल्यांनी चित्रपटाबाबत आपले मत व्यक्त केले. एका मुलाने आपण कठीण परिस्थिती कसे वागले पाहिजे हे यातून दिसून येत आहे.

‘दूध माँगोगे तो खीर देंगे, कश्मीर माँगोगे तो लाहौर भी छीन लेंगे’; सनीच्या ‘Maa Tujhe Salaam 2’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित!

आर बाल्की यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट घूमर अखेर रिलीज झाला आहे. तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर स्टारर या चित्रपटाचे जागतिक क्रिकेट आयकॉन्सनी कौतुक केले आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले आहे.

Vivek Agnihotri: ‘द कश्मीर फाइल्स’बद्दल सवाल करताच अग्निहोत्रींचा काढता पाय; Video Viral…

घूमरचे निर्माते नुकतेच भामला फाऊंडेशनसोबत एकत्र आले आणि खास दिव्यांग मुलांसाठी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित केले.विशेष स्क्रिनिंगमध्ये अभिषेक बच्चन, सैयामी खेर आर बाल्की आणि आसिफ भामला देखील उपस्थित होते. जिथे त्यांनी मुलांशी संवाद साधला आहे. या मुलांनी या चित्रपट कलाकारांशी संवाद साधला. शिवाय आपल्या भावना व्यक्त करत दंगा मस्ती केली आहे. या मुलांचे बोलणे, त्यांचे वागणे बघून कलाकारी भारावून गेले आहे.

या चित्रपटात शबाना आझमी, अभिषेक बच्चन, सैयामी खेर आणि अंगद बेदी हे कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की यांनी केले आहे राकेश झुनझुनवाला, अभिषेक बच्चन, गौरी शिंदे, डब्ल्यूजी सीडीआर रमेश पुलपाका (आरटीआरडी) आणि अनिल नायडू यांनी निर्मिती केली आहे.

Exit mobile version