Download App

‘माना कि हम यार नहीं’मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या दिव्या पाटीलने व्यक्त केल्या आपल्या भावना

खुशी इस्त्रीवाली आहे, जी उदरनिर्वाहासाठी कपड्यांना इस्त्री करण्याचे काम करते. आपल्या कुटुंबाचा आधार आणि ताकद आहे.

  • Written By: Last Updated:

स्टार प्लसवर लवकरच येत आहे एक नवीन मालिका ‘माना कि हम यार नहीं’. (Film) या मालिकेत मंजीत मक्कड कृष्णाच्या आणि दिव्या पाटील खुशीच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेची कहाणी ‘कॉन्ट्रॅक्ट मॅरेज’ या संकल्पनेवर आधारित आहे, ज्यात दोन अगदी भिन्न प्रकृतीच्या व्यक्ती एकत्र येतात.

खुशी इस्त्रीवाली आहे, जी उदरनिर्वाहासाठी कपड्यांना इस्त्री करण्याचे काम करते. आपल्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी तिने स्वतःवर घेतली आहे आणि ती आपल्या कुटुंबाचा आधार आणि ताकद आहे. दुसरीकडे, कृष्णा एक बदमाश प्रकृतीचा माणूस आहे. तो चतुर आणि चलाख आहे आणि जीवन जगण्याची त्याची स्वतःची अशी अनोखी रीत आहे.

कुटुंब, प्रेम आणि मैत्रीची कहाणी, मना’चे श्लोक; चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

या मालिकेत खुशीची भूमिका साकारणाऱ्या दिव्या पाटीलने या मालिकेत सहभागी असल्याचा उत्साह व्यक्त करताना सांगितले, खुशी या प्रमुख भूमिकेच्या रूपात स्टार प्लसवरील या मालिकेचा भाग झाल्याबद्दल मला आनंद वाटतो. माझ्यासाठी ही एक खूप मोठी संधी आहे. मी खूप रोमांचित आहे, आणि त्याच वेळी जरा भांबावलेली देखील आहे कारण ही व्यक्तिरेखा खूप आव्हानात्मक आहे. गणपतीत ही मालिका माझ्याकडे आल्यामुळे माझ्यासाठी ती खास आहे. सुरुवात खूप चांगली झाली आहे आणि त्याबद्दल मला आणि माझ्या घरच्यांना खूप आनंद झाला आहे.

आपल्या भूमिकेविषयी दिव्या सांगते, मी जेव्हा ही पटकथा पहिल्यांदा ऐकली, तेव्हाच मला या व्यक्तिरेखेची खोली आणि एकंदर कथानक खूप आवडलं होतं. खुशी एक सक्षम, निर्भीड आणि कष्टाळू मुलगी आहे, जी आपल्या कुटुंबाचा आधार बनून खंबीरपणे उभी आहे, आव्हानांना तोंड देत आहे आणि आपल्या माणसांची प्रेमाने काळजी घेत आहे. ती चुणचुणीत, भावनाप्रधान आणि चिवट मुलगी आहे. तिच्यात झुंजार वृत्ती आहे. तिचे तिच्या वडिलांशी खूप घट्ट नातं आहे. मला ती खूप जवळची वाटते, कारण खुशीप्रमाणेच माझंही माझ्या वडिलांशी खूप घट्ट नातं आहे आणि माझं कुटुंब माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं आहे.

follow us

संबंधित बातम्या