Dono Movie : राजवीर-पलोमाचा ‘दोनो’ 5 ऑक्टोबरला चित्रपटगृहात; ‘खम्मा घनी’ गाणं जयपुरमध्ये प्रदर्शित…

Dono Movie : हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या राजवीर देओल(Rajveer Deol) आणि पलोमाच्या(Palloma) जोडीला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. येत्या 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘दोनो’ चित्रपटातील खम्मा घनी हे गाणं प्रदर्शित झालं आहे. यामध्ये राजवीर देओल आणि पलोमाची जोडी दिसून येत आहे. जयपूरमध्ये हे गाणं प्रदर्शित झालं असून गाण्याला शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत लाभलं आहे. राजवीर आणि पलोमाचं […]

Dono

Dono

Dono Movie : हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या राजवीर देओल(Rajveer Deol) आणि पलोमाच्या(Palloma) जोडीला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. येत्या 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘दोनो’ चित्रपटातील खम्मा घनी हे गाणं प्रदर्शित झालं आहे. यामध्ये राजवीर देओल आणि पलोमाची जोडी दिसून येत आहे. जयपूरमध्ये हे गाणं प्रदर्शित झालं असून गाण्याला शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत लाभलं आहे.

राजवीर आणि पलोमाचं खम्मा घनी गाणं नूकतचं प्रदर्शित झालं असून या गाण्याला प्रेक्षकांकडून भलतीच पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. गायक शिवम महादेवन आणि श्रेया घोषल यांनी हे गाणं गायलं असून गाणं पाहिल्यानंतर त्यामध्ये राजस्थानी आवाजात गायल्याचं दिसून येत आहे. एकूण गाण्याचं चित्रीकरण पाहुन हे गाणं जयपूरमधील कॉलेजमध्ये प्रदर्शित केल्याचं दिसून येत आहे.

Ganesh Visarjan 2023 : नगरमधील वाहतूक मार्गात मोठे बदल; ‘या’ मार्गांनी वाहतूक वळवली

खम्मा घनी या गाण्याचे संगीत शंकर-एहसान-लॉय यांनी केलं असून गीत इर्शाद कामील यांनी लिहिली आहेत. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन विजय गांगुली यांनी केलं तर जयपूरमध्ये जेव्हा दोन्ही संघांनी गाणे लाँच केले तेव्हा प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे.

Manipur Violence : मणिपूर ‘अशांत’च! राज्य सरकारची मोठी घोषणा

देशातलं सर्वात जुनं प्रोडक्शन हाऊस म्हणून ओळखलं जाणारं राजश्री प्रोडक्शन हाऊसने जिओ स्टुडिओच्या सहकार्याने अवनिश एस बडजात्या दिग्दर्शित ‘दोनो’ हा 59 वा चित्रपट सादर केला आहे. कमलकुमार बडजात्या, दिवंगत राजकुमार बडजात्या आणि अजितकुमार बडजात्या यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटासाठी क्रिएटिव्ह प्रोडक्शनच काम सूरज आर. बडजात्या करत आहेत. हा चित्रपट 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version