Ganesh Visarjan 2023 : नगरमधील वाहतूक मार्गात मोठे बदल; ‘या’ मार्गांनी वाहतूक वळवली

Ganesh Visarjan 2023 : नगरमधील वाहतूक मार्गात मोठे बदल; ‘या’ मार्गांनी वाहतूक वळवली

Ganesh Visarjan 2023 : मोठ्या थाटामाटात विराजमान झालेल्या लाडक्या गणपती बाप्पाला आज निरोप देण्यासाठी गणेश मंडळं सज्ज झाली आहेत. नगर शहरात (Ahmednagar News) आज गणेश विसर्जनासाठी (Ganesh Visarjan 2023) प्रशासन देखील सज्ज झाले आहे. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने नगर शहरातून जाणारी वाहतूक वळविण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जारी केले आहेत. वाहनधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे.

‘या’ ठिकाणी गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी

नगर शहरातील नेप्ती नाका परिसरातील बाळाजी बुवा विहीर तसेच सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्यावरील यशोदानगर, विहीर या ठिकाणी गणपती विसर्जन करण्याकरिता मोठे बारव आहेत. आज या दोन्ही ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनाकरिता भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या दोन्ही विसर्जन बारवांची ठिकाणे रस्त्यालगत आहेत. या रस्त्यावरुन प्रचंड प्रमाणात वाहतुकीची वर्दळ सुरू असते. त्यामुळे वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय मुख्य मिरवणूक मार्गावरीलही वाहतूक वळवण्यात येणार आहे.

Weather Update : बाप्पाच्या निरोपालाही पाऊसधारा! आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार

पर्यायी मार्ग कोणते

नेप्ती बाह्यवळण रस्त्याकडून येणारी सर्व प्रकारची वाहतूक ही लिंक रस्ता-हॉटेल रंगोली चौक मार्गे, तर दिल्लीगेटकडून येणारी सर्व प्रकारचे वाहतूक लालटाकी मार्गे वळविण्यात येत आहे. यशोदानगर विहीर, पाईपलाईन रस्त्याकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग एकविरा चौक – पारिजात चौक पद्मावती टी पॉईंट मार्गे नगर-मनमाड रस्ता या मार्गाने वळविण्यात आली आहे. ही वाहतूक आज मध्यरात्रीपर्यंत वळविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हा आदेश रुग्णवाहिका, अग्निशामक दल, शासकीय वाहने, गणेश मूर्ती घेऊन येणारी वाहने, स्थानिक रहिवासी व स्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक कारणामुळे प्रवेश देण्यात येणारे वाहनांना लागू राहणार नाही, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना वाहतुकीतील या बदलांची माहिती घेऊनच घराबाहेर पडणे योग्य ठरेल.

‘उबाठा’ची गळती सुरूच! आता 3 शिलेदार शिंदेंच्या गळाला, सीएम शिंदेंच्या उपस्थितीत केला प्रवेश

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube