Weather Update : बाप्पाच्या निरोपालाही पाऊसधारा! आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार

Weather Update : बाप्पाच्या निरोपालाही पाऊसधारा! आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार

Weather Update : आज राज्यात सर्वत्र लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप दिला जात आहे. ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात मिरवणुका सुरू झाल्या आहेत. या उत्साहात पाऊसधारा (Weather Update) बरसणार आहेत. राज्यात आज गणेश विसर्जनाच्या (Ganesh Festival 2023) दिवशीही अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि मुंबईत आज मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) कोसळणार असल्याचा अंदाज आहे. आज पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, हँगिग गार्डन सात वर्षांसाठी होणार बंद

मागील काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. ऑगस्ट महिना आणि या महिन्यातील सुरुवातीचे काही दिवस पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. काही ठिकाणी आताच दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मागील आठवड्यापासून राज्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. पिण्याच्या पाण्याचे टेन्शन मिटले तसेच शेतातील पिकांनाही  जीवदान मिळाले. अजूनही राज्यात ठिकठिकाणी पाऊस सुरूच आहे. आज गणेश विसर्जनाचा दिवस आहे. या दिवशीही वरुणराजा हजेरी लावणार आहे.

कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. काल बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या 24 तासांत कोकणातील आंबोली येथे सर्वाधिक 117.8 मिलीमीटर पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातही पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस होत आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची 100 एकरात जाहीर सभा, पुढचं प्लॅनिंग काय?

नगर पुण्यात संततधार पावसाची हजेरी

राज्यातील नगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली या जिल्ह्यांत संततधार पाऊस सुरूा आहे. नाशिक जिल्ह्यांत सुरुवातीच्या टप्प्यात पाऊस झाला. नंतर मात्र पावसाने मोठी विश्रांती घेतली. आता मागील सहा दिवसांपासून या जिल्ह्यांतही चांगला पाऊस होत असल्याने शेतकरी सुखावला आहे. खानदेशातील जळगाव जिल्ह्यातही पावसाने जोर धरला आहे. एकंदरीतच राज्यात यंदा सर्वत्र पाऊस होत आहे. या पावसाने शेती पिकांच्या पाण्याची मोठी काळजी मिटवली आहे. तसेच काही ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. ती परिस्थिती निवळण्यास या पावसाने मदत होणार आहे.

Uddhav Thackeray : मोदी सरकारच्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या फुग्याला टाचणी; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube