Maratha Reservation : मनोज जरांगेंची 100 एकरात जाहीर सभा, पुढचं प्लॅनिंग काय?
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणकर्ते मनोज जरांगे(Manoj Jarange) मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी येत्या 14 ऑक्टोबरला 100 एकर जागेत जाहीर सभा घेणार आहेत. जालन्यातील अंतरवली सराटी गावात ही सभा पार पडणार असून त्यासाठी मनोज जरांगेंकडून(Manoj Jarange) जागेची पाहणी करण्यात आली आहे. दरम्यान, आमरण उपोषण सोडलं तरीही मनोज जरांगे यांचं साखळी उपोषण अद्यापही सुरुच आहे.
‘पाहुणे म्हणून या, पण भाडेकरी बनू नका’; विखेंचा थोरातांना खास शैलीत टोमणा…
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सलग 15 दिवस आमरण केलेले मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 40 दिवसांच्या आश्वासनानंतर उपोषण सोडलं होतं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. रुग्णालयातून सुट्टी मिळताच जरांगे यांनी पुन्हा साखळी उपोषण सुरु केलं असून आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यसभरातील मराठा बांधवांसोबत संवाद साधण्यासाठी येत्या 14 ऑक्टोबरला जाहीर सभा घेणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.
BJP On Supriya Sule : ‘धाब्यावर जाऊ ते बाप – लेकीला आस लवासाची; भाजपकडून कवितेला कवितेतून उत्तर
यासोबतच जाहीर सभेच्या माध्यमातून मराठा समाजाला एकत्र आणून संघटन करण्याचा प्लॅन असल्याचंही ते म्हणाले आहेत. या जाहीर सभेसाठी मी राज्यभर दौऱ्यादेखील करणार असून विविध जिल्ह्यांतील मराठा बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चाही करणार आहे. सध्या सरकारकडे आम्ही 40 दिवसांचा वेळ दिला असून जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावच लागेल; त्याशिवाय मराठा शांत बसणार नाही, असा पवित्राच जरांगे यांनी घेतला आहे.
Aparshakti Khurana: अभिनेता अपारशक्ती खुराणा चमकला अमेरिकेतील फिल्म फेस्टिव्हलमध्ये
जाहीर सभेसाठी किती लोकं येणार, हे मी सध्या सांगू शकत नाही पण दौऱ्या पूर्ण झाल्यानंतर मला किती बांधव येतील याचा अंदाज येणार आहे. माझा दौरा सरकारविरोधात नसून राज्यातील अनेक जिल्ह्यांत आरक्षणासाठी आत्महत्या होत आहे, त्यांना माझं सांगण की, आत्महत्या करु नका त्यासाठी माझा दौरा असणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांकडून उपोषण, आंदोलन करण्यात येत आहे, काही ठिकाणी तर आंदोलकांनी विष प्राशन केल्याच्याही घटना घडल्यां दिसून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने यावर तोडगा काढण्याची मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे. अशातच आता आपल्या दौऱ्यात मनोज जरांगे वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या उपोषणाला देखील भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरांगे यांचा महाराष्ट्र दौरा कसा असणार आणि ते कोणत्या-कोणत्या भागाचा दौरा करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.