‘पाहुणे म्हणून या, पण भाडेकरी बनू नका’; विखेंचा थोरातांना खास शैलीत टोमणा…

‘पाहुणे म्हणून या, पण भाडेकरी बनू नका’; विखेंचा थोरातांना खास शैलीत टोमणा…

Radhakrushna Vikhe On Balasaheb Thorat : पाहुणे म्हणून या, पण भाडेकरी बनण्याचचा प्रयत्न करु नका, या शब्दांत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांना खास शैलीत टोमणा मारला आहे. काही दिवसांपूर्वीच तुम्ही पालक म्हणून रहा मालक बनू नका, असा सल्लाचं बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) यांना दिला होता. त्यावरुन आता राधाकृष्ण विखे पाटलांनीही(Radhakrushna Vikhe patil) थोरात यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे. राहता शहरात विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान विखे पाटील बोलत होते.

‘तेव्हा मी नारायण राणेंसोबतच काँग्रेसमध्ये आलो’; जुना किस्सा सांगत वडेट्टीवारांनी नितेश राणेंना सुनावलं

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, स्वत:च्या तालुक्यातील जनतेला पिण्याचे पाणी देवू शकत नाहीत, त्यांनी इकडे येवून विकासाच्या गप्पा मारू नयेत. आम्हांला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. आमच्या तालुक्यातील जनता विकासला साथ देणारी आहे. इथले प्रपंच उध्वस्त करण्याचे काम करू नका. पाहुणे म्हणून येता पाहुण्यासारखे राहा, भाडेकरी बनण्याचा प्रयत्न करू नका, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

पुणे-मिरज रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे किती काम झाले? पूर्ण कधी होणार? मध्य रेल्वेने दिली सविस्तर अपडेट

तसेच आज शिर्डी येथे कार्यान्वित झालेले अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय ही उत्तर नगर जिल्ह्याकरीता मोठी उपलब्धी आहे. या कार्यालयाच्या इमारतीसाठी १०० कोटी रूपयांचा निधी लवकरच मंजूर होईल. विकासाचे प्रकल्प काम करून उभे करावे लागतात केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाहीत. अनेकांना महसूल मंत्री पदाची संधी मिळाली पण जिल्ह्यासाठी काहीच करणे त्यांना सुचले नाही, नसल्याची अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

Sanjay Raut : नागपूर पाण्यात बुडालं अन् तुम्ही कलाकारांसोबत… राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

जे स्वत:च्या तालुक्यातील जनतेला पिण्याचे पाणी देवू शकत नाहीत ते इकडे येवून सल्ले देतात‌, विकासाच्या गप्पा मारतात. पण आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. सामाजिक जबाबदारीतून इथे विकास साध्य होत आहे. या विकासाला गालबोट लावण्याचे काम सुरू झाले असल्याचा आरोपही विखे पाटलांनी यावेळी केला.

केंद्रीय मंत्री मोठा की सचिव मोठा? कांदा प्रश्न बैठकीत उपस्थितांना पडला प्रश्न


नेमकं काय म्हणाले होते बाळाासाहेब थोरात?

, तुम्ही संगमनेर तालुक्यातील सरकारी कर्मचाऱ्यांवर दहशत माजवण्यापेक्षा जिल्ह्याच्या दुष्काळाकडे गांभीर्याने पाहा, दहशत करुन तुम्ही तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा कोणताही विकास करु शकनार नाहीत किंवा विकास रोखू शकणार नाहीत, त्यामुळे तुम्ही राहाता तालुक्यातच लक्ष घाला, तिथल्या जनतेला तुमची गरज आहे. तसेच तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, त्यामुळे तुम्ही पालक म्हणूनच राहा, जिल्ह्याचे मालक बनू नका, असा सल्ला थोरात यांनी विखेंना दिला होता.

दरम्यान, व्यक्तिद्वेश करून तालुक्यातील जनतेचे प्रपंच उध्वस्त करू नका, आमच्याकडे वाळू आणि क्रशरचे माफीयाराज नाही. महसूल विभागात काही कठोर निर्णय केले, यामुळे अनेकांची चीडचीड वाढली असल्याचा टोलाही मंत्री विखे पाटील यांनी यावेळी लगावला आहे.राहाता शहरात सुमारे 10 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा तसेच शहीद जवान अनिल निकाळे यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील हस्ते करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube