मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, हँगिग गार्डन सात वर्षांसाठी होणार बंद

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, हँगिग गार्डन सात वर्षांसाठी होणार बंद

Hanging Garden : 136 वर्षांचा इतिहास असलेले मुंबईतील हँगिग गार्डन (Hanging Garden) पुढील सात वर्षांसाठी बंद होणार आहे. ब्रिटीश काळात बांधलेले आणि मुंबईची जुनी ओळख असलेल्या हँगिग गार्डनच्या जलाशयाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे (BMC) अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली.

2017 साली हँगिग गार्डनची खाली असलेल्या जलाशयाचे लेखापरिक्षण करण्यात आले होते. त्यावेळी जलाशयाच्या छताकडील भाग आणि आधारासाठी उभारलेले स्तंभ कमकुवत असल्याचे निर्दशनास आले होते. या टाकीची क्षमता 147 लीटर दशलक्ष लिटर आहे. त्यामुळे ती पूर्णपणे पाडल्याशिवाय त्याचे बांधकाम होणे अशक्य असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. परिणामी या जलशयाचे बांधकाम करण्याकरता हँगिग गार्डन टप्प्याटप्प्याने सात वर्षांसाठी बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, जलाशयाचे पाडकाम आणि पुनर्बांधणीसाठी 698 कोटी रुपयांचा खर्य अपेक्षित आहे.

‘पटोलेंना भाजप समजली नाही, स्फोट भाजपमध्ये नाही कॉंग्रेसमध्ये…’; बावनकुळेंचं मोठं विधान

दरम्यान, हँगिग गार्डन येथील या जलाशयाच्या विकासकामाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासंदर्भात बैठक बोलावली आहे. हँगिग गार्डनमधील या जलाशयातून दक्षिण मुंबईच्या अनेक भागात पाणीपुरवठा केला जातो. शहरातील उंचीपैकी असलेल्या जागेवर हे जलाशय बांधण्यात आले आहे. त्यामुले या प्रक्रियेत काहीतरी पर्यायी मार्ग शोधण्याचं आश्वासन लोढा यांनी स्थानिकांन दिलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube