Drishyam The Conclusion ची बॉक्स ऑफिसवर दमदार वाटचाल; 500 कोटींच्या क्लबमध्ये करणार प्रवेश

Drishyam The Conclusion : ‘दृश्यम द कन्क्लूजन’ ने बॉक्स ऑफिसवर आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. दुसऱ्या वीकेंडमध्येही चित्रपटाने

Drishyam The Conclusion

Drishyam The Conclusion

Drishyam The Conclusion : ‘दृश्यम द कन्क्लूजन’ ने बॉक्स ऑफिसवर आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. दुसऱ्या वीकेंडमध्येही चित्रपटाने जोरदार कमाई करत जगभरातील एकूण कलेक्शन 486.52 कोटींवर नेले आहे. त्यामुळे आता चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

दुसऱ्या रविवारच्या दिवशी चित्रपटाने जगभरात तब्बल 34.58 कोटींची कमाई केली. दुसरा वीकेंडही दमदार ठरल्याने चित्रपटाच्या कमाईला चांगलीच गती मिळाली आहे.विशेष म्हणजे, ‘दृश्यम द कन्क्लूजन’ने ‘दृश्यम 2’ च्या ओपनिंग वीकेंड कलेक्शनलाही मागे टाकले आहे. यामुळे यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्याची गणना होऊ लागली आहे.

कांद्याचे दर कमी होणार; मोदी सरकार घेणार मोठा निर्णय?

चित्रपटाच्या अंतिम अध्यायाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, वाढती थिएटर फुटफॉल आणि दमदार वर्ड ऑफ माउथमुळे दुसरा वीकेंडही बॉक्स ऑफिसवर सेलिब्रेशनमध्ये बदलला आहे.जगभरातील थिएटरमध्ये ‘दृश्यम द कन्क्लूजन’ची विजयी वाटचाल सुरूच असून, आता सर्वांच्या नजरा 500 कोटींच्या ऐतिहासिक टप्प्याकडे लागल्या आहेत.‘विजय की कहानी में… हीरो कभी जेल नहीं जाता!’ या संवादाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांवर चालल्याचे बॉक्स ऑफिसवरील आकडेवारीतून दिसून येत आहे.

म्हणूनच कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली…, अजित आगरकरांवर सर्वात मोठा आरोप –

Exit mobile version