Download App

Dunki Drop 6: किंग खानच्या ‘डंकी’तील ‘बंदा’ गाणं रिलीज ! शाहरुखच्या अ‍ॅक्शन मोडने वेधलं लक्ष

  • Written By: Last Updated:

Dunki Drop 6: शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) काही दिवसातच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’ या वर्षी दोन ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर आता शाहरुखचा रोमँटिक आणि अॅक्शन मोड प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. ‘बंदा’ (Banda Song) या गाण्याआधी ‘लुटपुट गया’, ‘निकले थे कभी हम घरसे’ आणि ‘ओ माही’ ही गाणी चाहत्यांच्या भेटीला आली आहेत. आता या गाण्यातील चौथ्या गाण्याने चाहत्यांचा लक्ष वेधून घेतलं आहे.


दिलजीत दोसांझच्या आवाजात डँकीचे नवीन गाणे रिलीज: चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी निर्मात्यांनी आता ‘डिंकी ड्रॉप 6’ रिलीज केला आहे. या चित्रपटाचे नवीन गाणे ‘बंद’ रिलीज झाले आहे, जे दिलजीत दोसांझने गायले आहे. या गाण्यात शाहरुख तापसीसाठी संपूर्ण जगाशी लढायला तयार आहे. गाण्यात तो भांडताना दिसत आहे. या गाण्यातील दोघांची जोडी तुमचे मन जिंकेल आहे.

शाहरुख खानने त्याच्या चित्रपटाचा हा लेटेस्ट ट्रॅक सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे शेअर करताना त्याने लिहिले की, ‘तुम जो मांग लोगे दिल तो ये जान देगा बंदा…. आणि दलजीत दोसांझचे आभार मानले. शिवाय किंग खानने दिलजीत दोसांझला टॅग करताना लिहिले आहे. पुढे लिहिले की, ‘पाजींनी या गाण्याला जीवदान दिले आहे. धन्यवाद. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो कारण तुझ्यामुळे सर्वजण हार्दिकवर प्रेम करू लागले आहेत.

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसची कोर्टात धाव; 200 कोटींच्या प्रकरणात दिलासा मिळणार?

नुकतचं या चित्रपटाचा रंजक ट्रेलर प्रदर्शित झाला, ज्याला चाहत्यांचा मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, यामध्ये शाहरुख आणि तापसी व्यतिरिक्त विकी कौशल आणि बोमन इराणी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटात शाहरुख खानने पहिल्यांदाच दिग्दर्शक राजकुमार हिराणीसोबत काम केले आहे.

Tags

follow us