Shah Rukh Khan : अबरामच्या DDLJ ची आयकॉनिक पोजने किंग खान झाला भावूक; Video Viral

Shah Rukh Khan : अबरामच्या DDLJ ची आयकॉनिक पोजने किंग खान झाला भावूक; Video Viral

Shah rukh khan gets Emotional: शाहरुख खानचा (Shah rukh khan) मुलगा अबराम खान (Abram Khan) त्याच्या शालेय कामगिरीमुळे जोरदार चर्चेत आला आहे. काल, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये (Dhirubhai Ambani International School) वार्षिक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात शाहरुख खान, गौरी खान, सुहाना खान, करण जोहर, शाहिद कपूर, रोहित शेट्टी, ऐश्वर्या बच्चन, करीना कपूर आणि मीरा राजपूत यांसारख्या बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by SRK VIBE (@_srkvibe2.0)


प्रत्येकजण आपल्या मुलांना आधार देण्यासाठी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या काळात शाहरुखचा 10 वर्षांचा मुलगा अबराम आणि ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या यांच्या अभिनयाची खूपच चर्चा रंगत आहे. अबरामने पापाची आयकॉनिक पोज दिली आणि किंग खान ते पाहून भावूक झाला. त्याला आपले अश्रूही आवरता आले नसल्यचे बघायला मिळाले आहे.

शाहरुख खानचा मुलगा अबराम याने शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात एका नाटकात भाग घेतला होता. त्या नाटकात त्यांनी विशेष भूमिका साकारली होती. त्याने ब्राऊन आणि ऑरेंज कलरच्या आउटफिटमध्ये दिसला आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओही समोर आला आहे, यामध्ये तो इंग्रजीत बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान शाहरुख खान आपल्या मुलाचा परफॉर्मन्स पाहून आणि त्याची आयकॉनिक पोज पाहून भावूक झाला. त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. आपल्या मुलाला प्रोत्साहन देताना तो सतत टाळ्या वाजवत होता. अबरामच्या अभिनयाची जोरदार चर्चा होत आहे. अबरामचा अभिनय पाहून शाहरुखचे चाहते देखील प्रभावित झाले आहेत.

Box Office: ‘अ‍ॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर कमाल! 15व्या दिवशीही केली छप्परफाड कमाई

अबरामचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी शाहरुख खानसह त्याची पत्नी गौरी आणि मुलगी सुहानाही पोहोचली होती. यावेळी किंग खानची सासू सविता छिब्बरही उपस्थित होती. आपल्या मुलाची कामगिरी पाहून त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. अभिनेत्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)


आराध्या बच्चननेही शानदार परफॉर्मन्स 

सोबतच आराध्या बच्चनच्या अभिनयाचीही जोरदार चर्चा होत आहे. आराध्याने शाळेच्या नाटकातही भाग घेतला होता, यामध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती. तिच्या या नाटकाचा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिचे संवाद इंग्रजीत बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. चाहते तिच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत आणि तिची आई ऐश्वर्याशी तुलना करत आहेत.

आराध्याचे हावभाव आणि शैली अगदी ऐश्वर्याशी मिळतीजुळती आहे. सोशल मीडियावर आराध्याच्या व्हिडिओवर एका यूजरने लिहिले की, ‘अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रायचा आवाज, अमित जीची उंची, जया जींचा राग. अभिनय जीन्समध्ये आहे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘सुहाना आणि खुशीने चांगले काम केले आहे.’ आराध्याला सपोर्ट करण्यासाठी ऐश्वर्यासोबत अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि आई वृंदा रायही आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)


करिनाचा लाडका तैमूर एका अनोख्या गेटअपमध्ये

आराध्या आणि अबरामशिवाय तैमूरचाही व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो एका अनोख्या गेटअपमध्ये दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्यासोबत आई करीना कपूरही दिसत आहे. ती त्यांना सोबत घेऊन हसताना दिसत आहे. तैमूरच्या गेटअपवरून अंदाज लावला जाऊ शकतो की त्याने शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात एका नाटकातही भाग घेतला होता. मात्र, त्यांच्या नाटकाचा व्हिडिओ समोर आलेला नाही. मात्र त्याचा लूक लोकांना खूप आवडला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube