Box Office: ‘अ‍ॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर कमाल! 15व्या दिवशीही केली छप्परफाड कमाई

Box Office: ‘अ‍ॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर कमाल! 15व्या दिवशीही केली छप्परफाड कमाई

Animal Box Office Collection Day 15: रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ ने (Animal Movie) थिएटरमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. (Animal Box Office) ए रेटेड चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी झाली आणि दोन आठवडे या चित्रपटाने अनेक अनोखे विक्रम मोडून मोठी कमाई केली. मात्र, आता संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. ‘अॅनिमल’ने रिलीजच्या 15 व्या दिवशी एकूण किती कोटींचा गल्ला जमवला?

 

View this post on Instagram

 

A post shared by Animal The Film (@animalthefilm)


15 व्या दिवशी भारतातील कमाई?

क्राईम थ्रिलर ‘अ‍ॅनिमल’ने देशभरातील आणि जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रचंड खळबळ उडवून दिली आणि मोठा गल्ला कमावला आहे. मात्र, आता रिलीजचा तिसरा आठवडा गाठला असतानाच ‘अ‍ॅनिमल’ची क्रेझ चाहत्यांमध्ये असल्याचं दिसत असून सोबतच चित्रपटाच्या कमाईतही घट होताना दिसत आहे.

पहिल्या आठवड्यात ‘अ‍ॅनिमल’ने 337.58 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या गुरुवारी ‘अॅनिमल’ने पहिल्यांदा सिंगल डिजिटमध्ये कमाई केली आणि 8.75 कोटींचा गल्ला कमावला आहे. दुसऱ्या आठवड्यात 139.26 कोटींचा व्यवसाय झाला. आता रणबीर कपूरच्या चित्रपटाच्या तिसऱ्या शुक्रवारी म्हणजेच 15व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘Animal’ ने रिलीजच्या 15 व्या दिवशी म्हणजेच तिसर्‍या शुक्रवारी 7.50 कोटी रुपये कमवले आहेत. 15 दिवसांत ‘अॅनिमल’चा एकूण व्यवसाय आता 797. 6 कोटी रुपयांचा झाला आहे. हे प्राथमिक आकडे असले तरी अधिकृत आकड्यांनंतर थोडे बदल होऊ शकणार आहेत.

रवीना टंडनच्या ‘Karmma Calling’चा टीझर रिलीज; दमदार भूमिकेत करणार OTTवर पदार्पण

‘अ‍ॅनिमल’ची जगभरातील कमाई किती ?

‘अ‍ॅनिमल’ ने जगभरातील चित्रपटगृहांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या 15 दिवसांत जगभरात 797. 6 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता हा चित्रपट 800 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या वीकेंडला हा आकडा हा चित्रपट पार करेल अशी अपेक्षा आहे.

‘अॅनिमल’ची स्टार कास्ट

‘अ‍ॅनिमल’चे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. या चित्रपटात रणबीर कपूरशिवाय बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘अ‍ॅनिमल’ हा बाप आणि मुलाच्या नात्यावर आधारित चित्रपट आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube