Download App

Dunki चं पहिलं गाणं रिलीज; शाहरूखच्या रोमॅंटीक अंदाजाने चाहत्यांना भूरळ

  • Written By: Last Updated:

Dunki : शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ (Dunki) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (Dunki Movie) किंग खानने (Shah Rukh Khan ) बॅक टू बॅक दोन ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यात या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

कर्जबाजारी शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ; दरपत्रकच शासनाला पाठवलं

चित्रपटाच्या निर्माते राजकुमार हिरानी या चित्रपटांतील गाणी रिलीज करायाला सुरूवात केली आहे. त्यात चित्रपटातील पहिलं गाण रिलीज करण्यात आलं आहे. ज्याचं नाव आहे ‘डंकी ड्रॉप 2 – लुट पुट गया’. हे गाणं एक रोमॅंटीक गाणं आहे. ज्यामध्ये शाहरूख म्हणजे चित्रपटाल हार्डी हा मनुच्या म्हणजे अभिनेत्री तापसी पन्नुच्या प्रेमात पडला आहे. हे दाखवण्यात आलं आहे.

हे गाणं प्रीतमने संगीतबद्ध केलं आहे. तर अरजित सिंगने ते गायलं आहे. तसेच या गाण्याचे बोल स्वानंद किरकिरे आणि आयपी सिंग यांनी लिहिले आहेत. गाण्यामध्ये शाहरूखने जो डान्स केला आहे. तो प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केला आहे. त्यामुळे हे गाणं आणखी खास बनलं आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा आदेश! ‘त्या’ वादात पडू नका; निवडणुकीची तयारी सुरू करा

किंग खानचा आगामी ‘डंकी’ हा सिनेमा धमाकेदार रिलीज आधीपासूनच जोरदार चर्चेत आहे. या सिनेमात तापसी पन्नू आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) मुख्य भूमिकेत चाहत्यांना बघायला मिळणार आहेत. ‘डंकी’ हा बहुचर्चित सिनेमा 21 डिसेंबर 2023 दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘डंकी’ या सिनेमाला U सर्टिफिकेट मिळाले आहे. ‘डंकी’ या सिनेमात किंग खानआणि तापसीसह विकी कौशल, बोमन ईरानी, तापसी पन्नू आणि सलमान खान महत्त्वाच्या भूमिकेमध्ये मनोरंजन करताना दिसणार आहेत.

Tags

follow us