कर्जबाजारी शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ; शासनाला दरपत्रकच पाठवलं
Hingoli News : यंदाच्या मान्सूनमध्ये(Mansoon) काही भागांत जास्त तर काही भागांत पावसाने पाठ फिरवल्याने म्हणावं तशी पिके आली नसल्याची परिस्थिती आहे. जे पीक आले आहेत, त्या पिकांच्या पैशांतून घेतलेलं पीक कर्जसुद्धा फेडणं शक्य नसल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी(Farmer) मोठं पाऊल उचललं आहे. हिंगोली जिल्ह्यातील 10 कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपले अवयव विकायला काढले आहेत. अवयवाच्या दराबाबत एक पत्रचं शेतकऱ्यांनी सरकारला धाडलं आहे. आमचे अवयव विकत घेण्याची मागणी कर्जबाजारी शेतकऱ्यांनी केली आहे.
सीएम शिंदे जाणार एकुलत्या एक उमेदवाराच्या प्रचाराला, अशोक गेहलोतांना देणार टक्कर
हिंगोलीत समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नूकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या सोयाबीनच्या पिकांतून लागवडीचाच खर्च निघालेला नाही. अशातच आता लागवडीसाठी घेतलेलं पीक कर्ज फेडायचं कसं? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. बाजारपेठेत विकलेल्या मालाला हमीभाव मिळाला नसल्याचं अजूनच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडूनच शेतकऱी मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे.
कार्तिकी एकादशीचा तिढा सुटला! पाच मागण्या मान्य केल्यानंतरच फडणवीसांना मिळाली परवानगी
हिंगोलीतल्या सेनगावमधील माझोड, केंद्रा बुद्रूक, ताकतोडा गावातील शेतकऱ्यांनी अवयव विक्रीसाठी काढले आहेत. यामध्ये शेतकरी गजानन कावरखे, दीपक कावरखे, विजय कावरखे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, गजानन जाधव, धिरज मापारी, नामदेव पतंगे, यांनी अवयव विकण्यासाठीचं दरपत्रक शासनाकडे निवेदनाद्वारे पाठवलं आहे.
श्रीलंकेकडून आयसीसीने हिसकावले विश्वचषकाचे यजमानपद, आता कुठे होणार स्पर्धा?
शेतकऱ्यांनी पाठवलेल्या दरपत्रकामध्ये किडनीचा दर 75 हजार, लिव्हर 90 हजार, डोळे 25 हजार रुपये असा दर शेतकऱ्यांनी शासनाकडे दिला आहे. निवेदन दिलेल्या शेतकऱ्यांकडे अनुक्रमे, गजानन कावरखे 2 लाख, दीपक कावरखे 3 लाख, विजय कावरखे १.10 लाख, दशरथ मुळे १.20 लाख, संजय मुळे 2 लाख, धिरज मापारी २.25 लाख, रामेश्वर कावरखे 90 हजार, नामदेव पतंगे २.99 लाख, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे यांच्या प्रत्येकी १.50 लाख ते 2 लाख रुपये कर्ज आहेत.
प्रिया बापट नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 90च्या दशकातील थ्रिलरमध्ये दिसणार मुख्य भूमिकेत
मराठवाड्यात पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने यंदाच्या वर्षी भीषण परिस्थिती निर्माण होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता उत्तर महाराष्ट्रातून मराठवाड्याला पाणी सोडण्याची मागणी जोर धरु लागली आहे. यासंदर्भात पाणी सोडण्याचे आदेशही न्यायालयाकडून नूकतेच देण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्राकडून पाणी मिळाल्यास मराठवाड्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार असल्याचं दिसून येत आहे.