श्रीलंकेकडून आयसीसीने हिसकावले विश्वचषकाचे यजमानपद, आता कुठे होणार स्पर्धा?

श्रीलंकेकडून आयसीसीने हिसकावले विश्वचषकाचे यजमानपद, आता कुठे होणार स्पर्धा?

Under-19 World Cup : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) श्रीलंकेकडून 2024 मध्ये होणाऱ्या अंडर-19 विश्वचषकाचे (Under-19 World Cup) यजमानपद हिसकावून घेतले आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित केली जाणार आहे. श्रीलंका क्रिकेटमधील (Sri Lanka Cricket Board) प्रशासकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. अहमदाबादमध्ये आयसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत चर्चा केल्यानंतर आयसीसीने एसएलसी निलंबित करण्याचा 10 नोव्हेंबरचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने सांगितले की, श्रीलंका संघाचा क्रिकेट सुरू राहील, परंतु निलंबन मागे घेतले जाणार नाही. क्रिकबझच्या मते, श्रीलंकेचे पदच्युत अध्यक्ष सॅमी सिल्वा यांनी मंगळवार 21 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील ITC नर्मदा येथे झालेल्या बोर्ड बैठकीत भाग घेतला होता.

देशात क्रिकेट सामान्यपणे सुरू राहतील
क्रिकबझने म्हटले आहे की निलंबन मागे घेतले जाऊ शकत नाही हा बोर्डाचा एकमताने निर्णय होता. देशात क्रिकेट सामान्यपणे सुरू राहतील. 19 वर्षाखालील विश्वचषक 13 जानेवारी 2024 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणार होता. स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत हलवल्यामुळे वेळापत्रकात बदल होणे निश्चित आहे.

‘पनौती’मुळे भारताचा पराभव; राहुल गांधींचा पीएम मोदींवर हल्लाबोल, भाजपकडून प्रत्युत्तर

दक्षिण आफ्रिका प्रीमियर लीगचा अडथळा
10 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान SA20 लीग सुरु होणार आहे, परंतु क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) च्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने क्रिकबझला सांगितले की, T20 लीग सीएसएच्या देखरेखीखाली असल्याने दोन्ही स्पर्धा एकत्र आयोजित केल्या जाऊ शकतात. श्रीलंका, बांग्लादेश, इंग्लंड, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, भारत, आयर्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांनी सरळ स्पर्धेत प्रवेश केला आहे.

India vs Australia: दावेदार असूनही ‘या’ खेळाडूला टीम इंडियात स्थान नाही

भारत सर्वात यशस्वी संघ
याशिवाय नामिबिया, नेपाळ, न्यूझीलंड, स्कॉटलंड आणि अमेरिका या संघांना क्वालिफायरच्या मदतीने तिकिटे मिळाली. भारत 19 वर्षांखालील 5 विजेतेपदांसह सर्वात यशस्वी संघ आहे. 1999-00, 2007-08, 2012, 2017-18 आणि शेवटची आवृत्ती 2021-22 मध्ये जिंकली. यश धुलच्या नेतृत्वाखाली, भारताने 2021-22 मध्ये वेस्ट इंडिजने आयोजित केलेले शेवटचे विजेतेपद जिंकले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube