India vs Australia: दावेदार असूनही ‘या’ खेळाडूला टीम इंडियात स्थान नाही

India vs Australia: दावेदार असूनही ‘या’ खेळाडूला टीम इंडियात स्थान नाही

India vs Australia T20 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी (India vs Australia) भारताने संघ जाहीर झाला आहे. या मालिकेसाठी संजू सॅमसनला (Sanju Samson) टीम इंडियात स्थान मिळालेले नाही. तो बराच काळ संघाबाहेर आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषकातही संजूचा संघात समावेश नव्हता. त्याने अनेक सामन्यात चांगली कामगिरी केली आहे आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड चांगला आहे.

सॅमसनने टीम इंडियासाठी शेवटचा टी-20 सामना ऑगस्ट 2023 मध्ये डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्ध खेळला होता. शेवटचा एकदिवसीय सामना ऑगस्ट 2023 मध्ये खेळला गेला होता. संजूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी संधी मिळालेली नाही. पण त्याचा देशांतर्गत रेकॉर्ड चांगला राहिला आहे. सॅमसनने भारतासाठी 21 टी-20 डावात 347 धावा केल्या आहेत. त्याने 12 एकदिवसीय डावात 390 धावा केल्या आहेत. सॅमसनला अनेक महत्वाच्या मालिकेत संघात स्थान मिळालेले नाही.

IND vs AUS Final : ऑस्ट्रेलिया जिंकला पण वॉर्नरनं मागितली माफी; नेमकं काय घडलं ?

संजूने T20 फॉरमॅटमध्ये एकूण 6190 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 शतके आणि 40 अर्धशतके केली आहेत. त्याने 117 लिस्ट ए सामन्यांमध्ये 3074 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने द्विशतक झळकावले आहे. सॅमसनने लिस्ट ए मध्ये एक शतक आणि 18 अर्धशतके झळकावली आहेत.

IND vs AUS Final : धक्कादायक! भारताचा पराभव अन् मटणाचा संबंध जोडत लहान भावाचीच केली हत्या

23 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारताने सूर्यकुमार यादवची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. ऋुतुराज गायकवाड उपकर्णधार असतील. इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांसारख्या अनेक नव्या खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल हे देखील या संघात आहेत. भारतीय संघ या मालिकेतील शेवटचा सामना 3 डिसेंबरला बंगळुरूमध्ये खेळणार आहे. टी-20 मालिकेतून भारताने वरिष्ठ खेळाडूंना ब्रेक दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube