World Cup Final : रोहितच्या ‘त्या’ दोन चुका पडल्या महागात; टीम इंडियाचं गणित हुकलंच

World Cup Final : रोहितच्या ‘त्या’ दोन चुका पडल्या महागात; टीम इंडियाचं गणित हुकलंच

World Cup Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या (World Cup Final) संघाने त्यांच्या लौकिकाला (IND vs AUS Final) साजेसा खेळ करत भारतीय संघाचा दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडू सगळ्याच आघाड्यांवर अपयशी राहिले. 241 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रे्लियाने (Australia) सहज पार केले. अंतिम सामन्यात अपयश आल्याने कोट्यावधी देशवासियांचे स्वप्न भंगले. परंतु, ऑस्ट्रेलियाने जशी स्ट्रॅटेजी आणि प्लॅन आखत हा सामना जिंकला तसे भारतालाही करता आले असते. विश्वचषकात अपराजित राहिलेला भारताचा संघ अंतिम सामन्यातच कसा काय ढेपाळला हाच मोठा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना सतावत आहे. काही चुका संघाने टाळल्या असत्या तर नक्कीच सामन्याचा निकाल वेगळा राहिला असता. आता या सामन्यातील अशाच दोन चुका समोर येत आहेत. ज्या टाळणे गरजेचेच होते.

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच तीन धक्के बसले होते. शमी आणि बुमराहने चांगली सुरुवात करून दिली होती. इथपर्यंत सारंकाही ठिक होतं. विजय मिळेल असे वाटत होते. पण, त्याचवेळी रोहित शर्माने (Rohit Sharma) एक चूक केली. जे त्याच्याकडून अपेक्षित नव्हतं.

Rohit Sharma : टीम इंडियाचा पराभव असह्य, रोहितला अश्रू अनावर..

शमी आणि बुमराह गोलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज दबावात होते. याचवेळी रोहितने रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांना गोलंदाजीसाठी बोलावलं. त्यानंतर सामन्याचं चित्रच पालटलं. हेड आणि लाबुशेन यांनी मोकळेपणाने खेळायला सुरुवात केली. त्यानंतर विकेट मिळेल या आशेने रोहितने सिराजला गोलंदाजीसाठी बोलावलं. पण, तोपर्यंत दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर सेट झाले होते.

यानंतर सिराजला विशेष काही करता आले नाही. तो संघाला विकेट मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्यानंतर रोहितने पुन्हा फिरकी गोलंदाजांना गोलंदाजीसाठी बोलावलं. कुलदीपने 6 ओव्हर्समध्ये 30 धावा तर जडेजाने 4 ओव्हर्समध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. पण, या दोघांनाही विकेट घेता आली नाही. दोन फिरकी गोलंदाज अपयशी ठरत असताना रोहितने दुसऱ्या बाजूला सिराजला गोलंदाजी द्यायला हवी होती या पद्धतीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दबाव वाढवता आला असता. पण, तसे काही घडले नाही.

IND vs AUS Final : …म्हणून टीम इंडियाचा पराभव झाला; नेटकऱ्यांकडून अहमदाबादचे प्रेक्षक टार्गेट 

हेड-लाबुशेन ठरले विजयाचे शिल्पकार 

भारताने 241 धावांचे दिलेले आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS Final) सहाव्यांदा वर्ल्ड कप (World Cup 2023) पटकावला आहे. ट्रॅव्हिस हेडने 120 चेंडूत 137 करत शतक झळकावले. मार्नस लाबुशेनने नाबाद 58 धावा करत अर्धशतक केलं. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. भारताकडून बुमराहने 2 विकेट घेतल्या. तर शमी आणि सिराजने 1 विकेट घेतली. इतर गोलंदाजाला एकही विकेट मिळाली नाही. अंतिम सामन्यात एकही भारतीय गोलंदाज प्रभावी दिसला नाही. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये बुमराह आणि शमीने भारताच्या आशा उंचावल्या होत्या, पण नंतर दोघेही निष्प्रभ दिसले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube