World Cup Final : ट्रेविस हेडने दाखवून दिलं, ‘जख्मी शेर ज्यादा खतरनाक होता है’!

World Cup Final : ट्रेविस हेडने दाखवून दिलं, ‘जख्मी शेर ज्यादा खतरनाक होता है’!

World Cup 2023 Final : सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारलेल्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) सहा विकेटने पराभव केला. यानंतर आता कालच्या मॅचमधील भारतासाठीचा खलनायक कोण? हा प्रश्न झोपेत जरी विचारला तरी लहान मुलंही ‘ट्रेविस हेड’चे (Travis Head) नाव पहिल्यांदा सांगेल. फिल्डिंग करताना रोहित शर्माचा टिपलेला अप्रतिम कॅच आणि त्यानंतर त्याने केलेली शतकी खेळी, या दोन्ही गोष्टी ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्वाच्या ठरल्या. याच्याच जोरावर तोच कालचा मॅन ऑफ द मॅच ठरला. (Travis Head played a very important knock in the final match of World Cup 2023)

पण हाच हेड दुखापतीमुळे वर्ल्डकपचे सुरुवातीचे सामने खेळला नव्हता. तो संघाचा भाग असणार की नाही हे पहिल्या पाच मॅचपर्यंत निश्चित नव्हते. मात्र ऑस्ट्रेलिया टीमने आणि निवड समितीने दाखविलेला विश्वास सार्थ ठरत जखमी खेळाडू ते विजयाचा हिरो असा प्रवास हेडने या स्पर्घेत पूर्ण केला. सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी हेडने ऑस्ट्रेलियासाठी अजरामर कामगिरी केली. सुरुवातीला तीन विकेट झटपट पडल्यावर कांगारू दडपणाखाली आले होते पण ट्रॅव्हिस हेड मार्नस लॅबुशेनला हाताशी धरले आणि विजय खेचून आणला. त्याचमुळे त्याच्या यशाच कौतुक करावचं लागतं.

हेडने दाखवून दिलं, ‘जख्मी शेर ज्यादा खतरनाक होता है’

वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. त्या मालिकेत ट्रॅव्हिस हेडचा हात मोडला. यानंतर तो मालिकेत खेळू शकला नाही. पण तोपर्यंत वर्ल्डकपच्या टीमची घोषणा झाली होती. त्यामुळे तो वर्ल्डकपसाठी फिट होईल का यावर मोठ्ठं प्रश्नचिन्ह होते. मेडिकल टीमने हेडला पूर्ण तंदुरुस्त होऊन मैदानात परतण्यासाठी किमान तीन आठवडे लागतील असे सांगितले.

World Cup विजयानंतर कांगारुंचा विजयी उन्माद! पायाखाली ट्रॉफी घेत मिचेल मार्शचे फोटोसेशन

निवड समितीसमोर हेडला वगळून दुसऱ्या खेळाडूला स्थान देण्याचा विचार सुरु केला. पण स्पर्धेच्या नियमानुसार एकदा टीममधून वगळले की तो प्लेअर त्या स्पर्धेत पुन्हा खेळू शकत नव्हता. यावर पर्याय म्हणून निवड समितीने हेडला टीममध्ये ठेवले. तो पहिल्या काही मॅच खेळू शकणार नाही, ही रिस्क माहिती असूनही त्यांनी धाडस केले. सुरुवातीच्या पाच मॅच ऑस्ट्रेलियन टीम 14 प्लेअर्ससोबत खेळली. त्यातील दोन हारल्या.

आल्यानंतरच ठोकली सेंच्युरी :

पण ऑस्ट्रेलियात रिहॅब प्रोसेस पूर्ण करुन हेड टीममध्ये आला. त्याच्यावर निवड समिती आणि टीमने दाखविलेल्या विश्वासाचा प्रचंड दबाव होता. याच दबावात तो उजळून निघाला. पहिल्याच मॅचमध्ये त्याने 59 बॉलमध्ये सेंच्युरी केली. त्यानंतर हेडने सेमी फायनलला दोन महत्त्वाच्या विकेट्स आणि हाफ सेंच्युरी केली. फायनल मॅचमध्ये फिल्डिंग करताना रोहित शर्माचा अप्रतिम कॅच टिपला आणि त्यानंतर त्याने शतकी खेळीही केली. ऑस्ट्रेलिया विजयी झाली. अन् जखमी हेड विजयाचा हिरो झाला.

World Cup : दहा वर्षात नऊ नॉकआऊट मॅचेसमध्ये पराभव : टीम इंडिया बनली ‘नवी’ चोकर्स?

पाच महिन्यांपूर्वीही हेडने भारताच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला होता.  021 ते 2023 या काळात टेस्टमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन टीम फायनलमध्ये पोहचल्या होत्या. या वर्षी जूनमध्ये फायनल मॅच खेळविली गेली. त्या मॅचमध्येही हेडने भारताविरुद्ध 163 रन्सची खेळी केली होती. त्याच्या याच खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube