Rohit Sharma : टीम इंडियाचा पराभव असह्य, रोहितला अश्रू अनावर..

Rohit Sharma : टीम इंडियाचा पराभव असह्य, रोहितला अश्रू अनावर..

Rohit Sharma : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्यांच्या लौकिकाला (IND vs AUS Final) साजेसा खेळ करत भारतीय संघाचा दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडू सगळ्याच आघाड्यांवर अपयशी राहिले. 241 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रे्लियाने (Australia) सहज पार केले. अंतिम सामन्यात अपयश आल्याने कोट्यावधी देशवासियांचे स्वप्न भंगले. सामना गमावल्याचे दुःख खेळाडूंच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होते. कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) अश्रू अनावर झाले. अंतिम सामन्यातील पराभवानंतर रोहित शर्मा भावनिक झाल्याचं दिसून आलं. स्पर्धेतील सगळ्या सामन्यात भारताने जबरदस्त खेळ करत विजय मिळवला. अंतिम सामन्यात मात्र तशी कामगिरी करता आली नाही. निराशाजनक कामगिरीचे फळ पराभवाच्या रुपात मिळाले.

140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले, ऑस्ट्रेलियाचा विजेतेपदाचा ‘षटकार’

सामना गमावल्यानंतर भारतीय खेळाडूंचे चेहरे पडले होते. पराभवाचं दुःख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. यानंतर रोहित शर्मा सगळ्यांशी हस्तांदोलन करत होता त्यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे स्पष्ट दिसत होते. यानंतर तो ड्रेसिंग रुममध्ये निघून गेला. त्याच्यापाठोपाठ अन्य खेळाडूही ड्रेसिंग रुममध्ये निघून गेले. स्टेडियममध्येही लाखो लोकांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती.

हेड-लाबुशेन ठरले विजयाचे शिल्पकार 

भारताने 241 धावांचे दिलेले आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS Final) सहाव्यांदा वर्ल्ड कप (World Cup 2023) पटकावला आहे. ट्रॅव्हिस हेडने 120 चेंडूत 137 करत शतक झळकावले. मार्नस लाबुशेनने नाबाद 58 धावा करत अर्धशतक केलं. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. भारताकडून बुमराहने 2 विकेट घेतल्या. तर शमी आणि सिराजने 1 विकेट घेतली. इतर गोलंदाजाला एकही विकेट मिळाली नाही. अंतिम सामन्यात एकही भारतीय गोलंदाज प्रभावी दिसला नाही. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये बुमराह आणि शमीने भारताच्या आशा उंचावल्या होत्या, पण नंतर दोघेही निष्प्रभ दिसले.

IND vs AUS Final : बदली खेळाडू म्हणून आला पण, जिगरबाज ठरला; लाबुशेनची शानदार खेळी 

अंतिम सामन्यात सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या मार्नस लॅबुशेनच्या जोडीने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी केली. या दोघांसमोर भारताचे सर्व गोलंदाज अपयशी ठरले. हेडने शतक तर लॅबुशेनने अर्धशतक झळकावले. दोन्ही फलंदाजांनी हुशारीने डाव पुढे नेत कांगारू संघाला विजयापर्यंत नेले. मात्र, ट्रॅव्हिस सामना जिंकण्यापूर्वी 2 धावांवर बाद झाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube