IND vs AUS Final : …म्हणून टीम इंडियाचा पराभव झाला; नेटकऱ्यांकडून अहमदाबादचे प्रेक्षक टार्गेट

  • Written By: Published:
IND vs AUS Final : …म्हणून टीम इंडियाचा पराभव झाला;  नेटकऱ्यांकडून अहमदाबादचे प्रेक्षक टार्गेट

IND vs AUS Final : विश्वचषकातील सर्व सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र, अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाच्या या पराभवानंतर करोडो चाहते दुःखात बुडाले असून, भारतीय संघाच्या पराभवामागे आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमधील (Narendra Modi Stadium) प्रेक्षक जबाबदार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली असून, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचे विधानानं या चर्चांना अधिक उधाण आले आहे.

…तर काहींच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं; कपिल देवच्या आमंत्रणावरून राऊतांचा निशाणा

नाव मोठं अन् लक्षण छोटं

नाव मोठं आणि लक्षण छोटं या म्हणीप्रमाणे गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमममध्येदेखील काहीशी अशीच परिस्थिती होती. 1 लाख 30 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या जगातील या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामन्यादरम्यान चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. अंतिम सामन्यासाठी मैदानावर जमलेला निळा समुद्र पाहून ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सही थोडा घाबरला होता. परंतु, झाले सर्व उलटेच. याचमुळे भारतीय संघाच्या पराभावामागे स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षक कारणीभूत असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पराभवानंतर स्टेडियमधील प्रेक्षक टीकेचे धनी

विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारताच्या पराभवानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून, या दारूण पराभवानंतर सोशल मीडियावर स्टेडियममधील प्रेक्षकांना थेट लक्ष्य केले जात आहे.

IND VS AUS Final : ‘तो पॅट कमिन्स…’ म्हणत टीम इंडियाच्या पराभवानंतर आमदार तनपुरेंची कन्या ढसा ढसा रडली

अहमदाबादच्या प्रेक्षकांचा गुन्हा काय?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, भारताच्या पराभवामागे अहमदाबादच्या प्रेक्षकांचा गुन्हा काय? आणि जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये असे काय घडले ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला. तर, या सर्वाचा संबंध नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांच्या गोंगाटाशी आहे. सोशल मीडियावरही याच आशयाची चर्चा सुरू असून, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचं विधानही काहीसं प्रेक्षकांच्या गोंगाटाशी मिळतं जुळतं आहे.

स्टेडियमध्ये चाहत्यांचा आवाज पडला कमी

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान असून, या ठिकाणी 1 लाख 30 हजार प्रेक्षख बसतील एवढी आसान क्षमता आहे. कालच्या सामन्यात संपूर्ण स्टेडियम भारतीय क्रिकेट चाहत्यांनी भरले होते. पण, जेव्हा टीम इंडियाला याच उपस्थित चाहत्यांच्या पाठिंब्याची गरज होती तेव्हा स्टेडियममध्ये शांतता होती, असे बोलले जात आहे. याचा अर्थ मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला चाहत्यांकडून चिअरअप करण्यात जो जोश, उत्साह दिसायला हवा होता तो दिसून आला नाही.

IND VS AUS Final : एक प्रशिक्षक म्हणून त्यांना सर्वांना…, पराभवानंतर कोच द्रविडने सांगितली ड्रेसिंग रूममधील परिस्थिती

पॅट कमिन्सनेदेखील कबूल केले

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विजयासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढवण्याची जबाबदारी उपस्थित प्रेक्षकांची होती. मात्र, ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी स्टेडियम खचाखच भरले होते. त्यामानाने चाहत्यांचा आवाज नव्हता. ज्यावेळी आम्ही गोलंदाजीसाठी स्टेडियममध्ये उतरलो त्यावेळी तेथे उपस्थित निळा समु्द्र पाहून आमच्या छातीत काहाशी भीती निर्माण झाली होती. पण, चाहत्यांकडून भारतीय संघाला ज्या पद्धतीने चिअरअप करणे अपक्षेति होते तसे झाले नाही.

मुंबई, चेन्नई, कोलकाता येथे मिळाला असता चांगला पाठिंबा

कोणताही सामना जिंकण्यासाठी केवळ मोठं मैदान लाखो चाहते उपस्थित असणे महत्त्वाचे असते असे नाही. तर, त्या ठिकणी उपस्थित असलेल्या चाहत्यांचा उत्साहदेखील महत्त्वाचा असतो. मात्र, ज्या पद्धतीने अहमदाबादच्या स्टेडियमवर गोंगाट हवा होता. तो झाला नाही. त्यामुळे विश्वचषकातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमऐवजी मुंबई, चेन्नई, कोलकाता किंवा बेंगळुरूमध्ये खेळवला गेला असता तर, येथील प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळाला असता अशी चर्चा नेटकरी व्यक्त करू लागले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज