‘पनौती’मुळे भारताचा पराभव; राहुल गांधींचा पीएम मोदींवर हल्लाबोल, भाजपकडून प्रत्युत्तर
Rahul Gandhi : ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देखील उपस्थित होते. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. राजस्थान येथे विधानसभा निवडणूक प्रचारसभेत राहुल गांधीनी मोदींना पनौती म्हटले. “अच्छे भले हमारे लड़के वहा पे वर्ल्ड कप जीत जाते, पर पनौती ने हरवा दिया” असे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांना या वक्तव्यावरुन माफीची मागणी केली आहे. यासंदर्भात भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी पंतप्रधान मोदींसाठी जे शब्द वापरत आहेत ते अशोभनीय आहे. राहुल गांधींना मोदींची माफी मागावी लागेल. अन्यथा आम्ही हा देशातील मोठा मुद्दा बनवू.
राहुल गांधी यांचे वक्तव्य
राहुल गांधी यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी जालोरमध्ये सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “ते (मोदी) क्रिकेटच्या मॅचला जाणार, ते मॅच हरणार ही वेगळी गोष्ट आहे, पनौती! पीएम म्हणजे पनौती मोदी.”
पनौती 😉 pic.twitter.com/kVTgt0ZCTs
— Congress (@INCIndia) November 21, 2023
‘तेरी मोहब्बत में हो गए फना, मांगी नौकरी मिला आटा..,’; भाजप खासदाराचा घरचा आहेर
राहुल गांधी म्हणाले की, “बरं, आपली टीम तिथे वर्ल्ड कप जिंकली असती, पण तिथे पनौतीचा पराभव झाला, पण टीव्हीवाले हे म्हणणार नाहीत. जनतेला हे माहीत आहे.”