शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण : शिंदे गटाच्या वकिलांकडून ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी
Shivsena Mla Disqualification Case : शिवसेना (Shivsena)आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची मंगळवारी (दि.21) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यामध्ये शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी(Mahesh Jethmalani) यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu)यांची चांगलीच उलटतपासणी केली. वकीलांनी इंग्रजीच्या मुद्यावरुन सुनील प्रभू यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रभू यांनी त्यांचा हा शाब्दिक हल्ला परतवून लावला. मला इंग्रजी भाषा वाचता येते आणि समजते. मला माझ्या मराठी भाषेत चांगले समजते. त्याबद्दल मी कॉन्फिडन्ट आहे, असेही प्रभू म्हणाले.
Tiger च्या तिन्ही चित्रपटांमुळे माझं करिअर… टायगर 3 निमित्त सलमानने व्यक्त केल्या भावना
वकील जेठमलानी यांनी सुनावणी दरम्यान सुनील प्रभू यांना 2019 च्या निवडणुकीच्या प्रचारात तुम्ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली होती का? असा प्रश्न केला. त्यावर सुनील प्रभू म्हणाले की, माझ्या मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढल्यामुळे मला या सर्व गोष्टी करण्याची गरज पडली नाही. त्यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना सुनावणीचे रेकॉर्डिंग करण्याची मागणी फेटाळल्यानंतर तुम्ही ती वारंवार का करता? असाही सवाल केला.
‘तेरी मोहब्बत में हो गए फना, मांगी नौकरी मिला आटा..,’; भाजप खासदाराचा घरचा आहेर
शिवसेना अपात्रता प्रकरणासंबंधी ठाकरे गटाने आजच्या सुनावणीमध्ये आपल्याकडील दस्तावेज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केली. शिंदे गटाला हे दस्तावेज सादर करण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी याप्रकरणी 21 जून 2022 रोजी मनोज चौघुले यांनी शिंदेंचे स्वीय सहायक प्रभाकर काळे यांना पाठवलेल्या व्हॉट्सअॅपचा मेसेच रेकॉर्डवर घेतला. मुंबईमध्ये शिवसेना विभाग प्रमुखांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या समर्थनाचे प्रतिज्ञापत्र आणि 2 जुलै 2022 रोजी ईमेलवर पाठवलेल्या व्हिपची कॉपीदेखील रेकॉर्डवर घेतली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची सभागृहामध्ये उलटतपासणी केली. त्यावेळी वकील जेठमलानी यांनी प्रभू यांना प्रश्न विचारला की, तुम्ही या अपात्रता याचिका इंग्रजीत दाखल केल्या आहेत का? त्यावर प्रभू म्हणाले की, मी मराठीत याचिका दाखल केली. माझ्या वकिलांनी त्याचा इंग्रजीत ड्राफ्ट तयार करुन दिला आहे.
त्यानंतर जेठमलानी यांनी विचारले की, तुम्ही अपात्रता याचिकेमध्ये कुठेही तुम्ही जे काही सांगितलं ते मराठीत सांगितल्याचं म्हटलं नाही. त्यावर प्रभू म्हणाले की, मी जे काही म्हटले आहे, ते रेकॉर्डवर आहे. त्यानंतर प्रभू यांनी मराठीमध्ये विचारण्याची विनंती केली. या सवालजवाबानंतर सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रभू यांना विचारले की, पिटीशन ड्राफ्ट करताना ते आपल्याला मराठीत समजवले आहे, असे कुठेही नमूद केले नाही, त्यावर तुमचं मत का? त्यावर मला समजावल्यानंतर मी त्यावर सही केली असे प्रभू यांनी सांगितले.