‘तेरी मोहब्बत में हो गए फना, मांगी नौकरी मिला आटा..,’; भाजप खासदाराचा घरचा आहेर
Varun Gandhi : भाजपचे खासदार वरुण गांधी(Varun Gandhi) यांनी बेरोजगारीवरून सरकारला घरचा आहेर दिला आहे. शेरोशायरी करीत खासदार वरुन गांधींनी सत्ताधारी सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढवला आहे. ‘तेरी मोहब्बत में हो गए फना, मांगी थी नौकरी मिला आटा, दाल और चना,’ या शब्दांत वरुण गांधी यांनी सरकारवर बेरोजगारीवरुन सडकून टीका केलीयं. उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये जनसंवादात वरुन गांधी बोलत होते.
Sangram Jagtap : …तर उपोषणाला बसणार! आमदार जगतापांचा पोलीस प्रशासनाला इशारा
खासदार गांधी म्हणाले, 8 वर्षांत खरा पगार केवळ 1 टक्का वाढला असला तरी महागाई अनेक पटींनी वाढली आहे. महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. महागाईमुळे लोकांच्या बचतीचं बजेट कोलमडलं असून सरकार फक्त मैदा, डाळ, हरभरा देत आहे मात्र,रोजगार देत नाही. निवडणूक जिंकण्यासाठी हे केले जात असल्याचंही वरुण गांधी म्हणाले आहेत.
तसेच अनेकवेळा आपण ऐकतो की सरकार स्थिर आणि कायम आहे, परंतु लोक आनंदी आहेत आणि त्यांचे जीवन मजबूत आहे, तर असं अजिबात नाही. उत्तर प्रदेश आधीच बेरोजगारीच्या गर्तेत आहे. आता हा आकडा आणखी वाढून 18 लाख लोकांवर पोहोचला आहे. याचा फटका सुमारे एक कोटी लोकांना बसला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
MLA Disqualification : सुनावणी संपली! ठाकरे गटाने दिले पुरावे, शिंदे गटाला 24 नोव्हेंबरची मुदत
पूर्वी सरकारी नोकरी हीच सर्वसामान्यांची नोकरी होती. खाजगीकरण झाल्यापासून, नोकरी मिळणे सोडा, याचा विचार करणेही अवघड झाले आहे. त्यामुळेच दोन भारत निर्माण झाले आहेत. एका भारतात माणसे सुरळीत चालू आहेत तर दुसऱ्या भारतात अवघड सुरु आहे. गेल्या सात वर्षांत 28 कोटी लोकांनी सरकारी नोकऱ्यांसाठी परीक्षा दिल्या, मात्र केवळ सात लाख लोकांनाच नोकऱ्या मिळाल्या, असल्याची आकडेवारी सांगतचं गांधी यांनी टीकास्त्र सोडले आहे.
Manoj Jarange : ‘मराठा आरक्षणाच्या आड आला तर सुट्ट़ी नाहीच’; जरांगे पाटलांचा इशारा कुणाला?
देशात पूर्वी इंजिनिअरची नोकरी ही खूप मोठी नोकरी मानली जात होती, पण आता त्याची अवस्थाही वाईट आहे. दरवर्षी 15 लाखांहून अधिक इंजिनिअर पदवीधर होतात, परंतु केवळ 15 टक्के नोकऱ्या मिळतात. खेड्यातील शेतकरी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेतो पण जेव्हा त्याला नोकरी मिळत नाही तेव्हा त्याच्या मनात काय जात असेल याची कल्पना करा, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, खासदार वरुण गांधी दोन दिवसांच्या पिलीभीत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात वरुण गांधी यांचं समर्थकांनी जल्लोषात स्वागत केलं. बिसलपूर येथील अभय भगवंतपूर, सोरा, माझगव्हाण, राडेता, रोहनिया भुडा आदी गावांमध्ये गांधी यांनी जनसंवाद साधला आहे.