पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोनदा टक्कर; आता अजय राय यांच्यावर काँग्रेसकडून उत्तर प्रदेशची मोठी जबाबदारी !

  • Written By: Published:
पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोनदा टक्कर; आता अजय राय यांच्यावर काँग्रेसकडून उत्तर प्रदेशची मोठी जबाबदारी !

लखनौः लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची इंडिया आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. या आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये जोर लावण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी तेथील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसने आता फेरबदल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दोनदा लोकसभा लढविणारा नेता अजय राय यांना थेट उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.


Ghulam Nabi Azad : ‘हिंदू धर्म इस्लामपेक्षा जुना, आजचे सर्व मुस्लिम पूर्वीचे हिंदूच’

बृजलाल खाबरी यांच्यावर गेल्या वर्षभरापासून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होता. त्यांना हटवून राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खाबरी यांना दुसरी जबाबदारी देण्यात आलेली नाही. अजय राय हे प्रयागराज्य प्रांतीय अध्यक्ष होते. आता प्रांतीय अध्यक्षाचे पदही काँग्रेसने रद्द केले आहे.


पती दहशतवादी, पत्नी मानवधिकार मंत्री! यासिन मलिकच्या पत्नीचा पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात समावेश

काँग्रेसचे अजय राय हे 2014 आणि 2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुध्द वाराणसी लोकसभा निवडणूक लढले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर त्यांचा निभाव लागला नव्हता. मोठ्या मतधिक्याने राय हे पराभूत झाले होते. राय यांना प्रदेश अध्यक्ष करून पूर्वांचल भागात पक्ष वाढविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. अजय राय हे पाच वेळा आमदारही राहिले आहेत.

उत्तर प्रदेशमधील सवर्ण हे भाजपवर नाराज आहेत. ही व्होटबँक आपल्याकडे खेचण्यासाठी अजय राय यांच्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. पक्षाचे जनरल सेक्रेटरी वेणुगोपाल यांनी राय यांची नियुक्ती जाहीर केली आहे.


प्रियंका गांधी ही जबाबदारी सोडणार ?

काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा हे उत्तर प्रदेशच्या प्रभारी आहेत. प्रियंकाही प्रभारी पद सोडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकांसाठी प्रियंका गांधी या व्यस्त राहणार असून, त्यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असणार आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशाचे प्रभारी पद दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यात येण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube