जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा, हायकोर्टाचा निर्णय कायम
Jayakwadi Dam : मराठवाडा प्रश्नात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोठा निर्णय दिला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाणी सोडलं जाणार आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत 8.5 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे.
जायकवाडीच्या पाण्यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती. मराठवाडा असोशिएन आणि माजी आमदार कल्याण काळे यांनी जायकवाडी धरणात नाशिक व अहमदनगर मधील धरणातून पाणी सोडावं यासाठी याचिक दाखल केली होती. आता सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडली असून मराठवाड्याला पाणी सोडण्याचा प्रश्न मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे.
कृषीमंत्री Dhananjay Munde यांच्या ‘त्या’ कामाची केंद्राकडून दखल अन् शेतकऱ्यानेही मानले आभार
समन्यायी पाणी वाटप धोरण कायद्यानुसार नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून साडे आठ टीएमसी पाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले होते. मात्र नगर जिल्ह्यातून पाणी सोडण्यात येऊ नये अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली होती.
नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय एक बैठक झाली होती. या बैठकीत जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये असा सर्वपक्षीय ठराव झाला होता. मात्र यावरून कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. जायकवाडीला पाणी सोडण्यात यावे अशी भूमिका मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली होती.
MLA Disqualification : आजची सुनावणी संपली! ठाकरे गटाने दिले पुरावे, शिंदे गटाला 24 नोव्हेंबरची मुदत
कोणत्या धरणातून किती पाणी सोडणार?
नगर जिल्ह्यातील मुळा (मांडओहोळ, मुळा) या धरणसमुहातून 2.10 टीएमसी, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) या धरणसमुहातून 3.36 टीएमसी, असे एकूण नगरच्या धरणांमधून 5.46 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तर नाशिकच्या गंगापूर धरण समुहातुन (गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी) 0.5 टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. दारणा धरण समुहातून (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) आडीच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. असे एकूण नाशिकच्या धरणातून तीन टीएमसीपेक्षा पाणी सोडण्यात येणार आहे.