‘निवडणुकीच्या तयारीला लागा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं 13 खासदारांना फर्मान…

‘निवडणुकीच्या तयारीला लागा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं 13 खासदारांना फर्मान…

Cm Eknath Shinde : राज्यात आता आगामी निवडणुकांचं वेध लागलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. याच अनुषंगाने शिवसेनेचा शिंदे गटही(Shivsena Shinde Group) मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं पाहायला मिळतंय. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी तयारीला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी 13 खासदारांना दिले आहेत. शिंदे गटाचे नेते आणि खासदार कृपाल तुमाने यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तुमाने यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्वाचा; आमदार अपात्रतेची सुनावणी

खासदार तुमाने म्हणाले, शिवसेनेच्या शिंदे गटातील 13 खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे 13 खासदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं तुमाने यांनी स्पष्ट केलं आहे.

‘मंदिरातल्या दानपेटी काढल्या तर पुजारी पळून जातील’; वडेट्टीवारांचं नवा वाद पेटवणारं विधान

राज्यातील एकूण 28 सर्कलमध्ये सध्या शिवसेनेच्यावतीने मेडिकल कॅम्प घेण्याचं काम सुरु आहे. या मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून आम्ही जनतेशी संवाद साधत असून एकूण 58 सर्कलमध्ये मेडिकल कॅम्प घेणार आहोत. आगामी निवडणुकीत आमच्या पक्षाचे 13 उमेदवार रिंगणात उतरणार असून शिंदे गटाचे खासदार निवडणूक लढवणार यात शंका नसल्याचंही तुमाने यांनी ठामपणे सांगितलं आहे.

Travis Head : आधी ‘कसोटी’ आता ‘वर्ल्डकप’! ‘हेड’ दोनदा ठरला टीम इंडियाची ‘डोकेदुखी’

जागा वाटपाचा फॉर्मूला अद्याप ठरला नाही :
राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे. शिवसेनेचा शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट असं महायुतीचं सरकार स्थापन आहे. आगामी निवडणुकीत महायुती निवडणूक लढवणार आहे. महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला अद्याप ठरलेला नाही. नागपुर अधिवेशनानंतर जागावाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करणार असल्याचे संकेत कृपाल तुमाने यांनी दिले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube