नमो शेतकरी महासन्मान योजनेला निधी मंजूर, 1720 कोटींची मान्यता, लवकरच जमा होणार पैसे

  • Written By: Published:
नमो शेतकरी महासन्मान योजनेला निधी मंजूर, 1720 कोटींची मान्यता, लवकरच जमा होणार पैसे

Namo Shetkari Yojna Updates : केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000 रुपये देण्याची घोषणा केली होती. नमो शेतकरी महासन्मान या योजनेअंतर्गत (Namo Shetkari Mahasanman scheme) केंद्राप्रमाणेच 4 महिन्यांत 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या (farmers) खात्यात जमा करणार, असं राज्य सरकारने (State Govt) सांगितलं होतं. मात्र, या निधीचा एकही हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या मिळाला नव्हता. मात्र, आता या योजनेच्या पहिल्या हप्त्याला सरकारने मंजूरी दिली. त्यासाठी सरकराने 1 हजार 720 कोटींच्या निधीला मान्यता दिली.

बाळासाहेबांनी अंगार फुलवला तिथे वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 या वर्षाच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. ही योजना केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी केंद्राचे 6 हजार रुपये आणि राज्य सरकारचे 6 हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये जमा होणार आहेत. पीएम सन्मान निधीचे लाभार्थी असलेले शेतकरीच राज्य योजनेसाठी पात्र ठरतील, अशी घोषणाही करण्यात आली होती

नमो शेतकरी महासम्मान निधी योजना जून 2023 मध्ये लागू करण्यास मान्यता देण्यात आली. दरम्यान, आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपये इतका निधी देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. त्यामुळं आता लवकरच एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीच्या पहिल्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.

पीएफएमएस प्रणालीद्वारे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाईल. PMKISAN योजनेप्रमाणे, MahaIT द्वारे MahaDBT पोर्टलवर ‘नमो शेतकरी महासम्मान निधी’ योजनेचे मॉड्यूल विकसित करण्याचे काम जोरात सुरू आहे. लवकरात लवकर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील, असे कृषिमंत्री मुंडे यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube