Weather Update : घटस्थापनेला पाऊस! राज्यात ‘या’ भागात होणार मुसळधार

पुण्यात अतिमुसळधार पावसाचा अलर्ट; शाळांना सुट्टी, रस्ते पाण्यात, शहराची उडाली दैना

Weather Update : राज्यात मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली असली (Weather Update) पावसाने अजून पूर्ण माघार घेतलेली नाही. सध्य ऑक्टोबर महिन्यातील ऊन जाणवायला लागले आहे. तरी देखील काही भागात पावसाची (Maharashtra Rain) शक्यता दिसून येत आहे. राज्यात पुढील 48 तासात कोकणासह काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रविवारी कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. इतकेच नाही तर पुढील 48 तासांत उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. या काळात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या दोन दिवसात कोकण किनारपट्टीसह उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस होईल अशी शक्यता आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांतही आज पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान देशात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

याआधी 5 ऑक्टोबरनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होईल असे हवामान विभागाने सांगितले होते. तसा पाऊस कमी झाला.  या महिन्यात अजून तरी राज्यात कुठे जोरदार पाऊस झालेला नाही. ढगाळ वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल. पण, पावसाची शक्यता कमी राहिल असे हवामान विभागाने सांगितले होते. ऑक्टोबर महिन्यात सर्वत्रच कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या महिन्यातच मान्सून माघार घेत आहे. असे असताना राज्यात काही ठिकाणी पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण होत आहे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. आता येथे पिके काढणीला आली आहेत. अशा परिस्थितीत जर पाऊस झाला तर त्याचा फटका या पिकांना बसू शकतो.

Weather Update : ऑक्टोबरची धगधग वाढणार, घरातून बाहेर पडताना काळजी घ्या; हवामान विभागाचा अंदाज

आज आणि उद्या हिमाचल प्रदेशातील कुल्लू, मंडी आणि शिमला जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान उत्तर प्रदेशात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह अतिवृष्टी होण्याचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Tags

follow us