CM शिंदे जाणार एकुलत्या एक उमेदवाराच्या प्रचाराला, अशोक गेहलोतांना देणार टक्कर

CM शिंदे जाणार एकुलत्या एक उमेदवाराच्या प्रचाराला, अशोक गेहलोतांना देणार टक्कर

Eknath Shinde : राजस्थान विधानसभेची निवडणूक (Rajasthan Assembly Elections) अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या एकुलत्या एक उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्या (23 नोव्हेंबर) राजस्थान दौऱ्यावर जात आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात आलेले मंत्री राजेंद्र गुढा (Rajendra Gudha) यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या प्रचारासाठीच एकनाथ शिंदे राजस्थानात जाणार आहेत.

विशेष म्हणजे राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने राजस्थानच्या राजकारणात प्रवेश केला होता. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात भाजपला पाठिंबा देण्यासाठी आणि काँग्रेसला टक्कर देण्यासाठी शिवसेनेने राजस्थानमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेची सुरुवात अशोक गेहलोत मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात आलेले मंत्री राजेंद्र गुढा यांच्यापासून झाली. सप्टेंबरमध्येच राजेंद्र गुढा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजस्थानमधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. यासोबतच एकनाथ शिंदे महाराष्ट्राबाहेर इतर राज्यातही पक्षाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहेत.

प्रफुल्ल पटेलांची खासदारकी रद्द करा, शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाची उपराष्ट्रपतींकडे मागणी

राजेंद्र गुडा राजस्थान शिवसेनेचे समन्वयक
अशोक गेहलोत सरकारमधून मंत्रिपदावरून बडतर्फ झाल्यानंतर राजेंद्र गुढा यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. राजस्थानचा सर्वात मोठा राजकीय मुद्दा – लाल डायरीच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेले राजेंद्र गुढा यांनी झुंझुनूमध्ये एकनाश शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्यावर समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली होती.

सरकारी काम अन् अर्धा तास थांबणं भोवलं; न्यायालयाने पोलिसांना दिली गवत कापण्याची शिक्षा

राजेंद्र गुढा हे एकेकाळी अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांना मुख्यमंत्री करण्यात गुढा यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जात होते. लाल डायरीमध्ये असा दावाही करण्यात आला होता की, गुढाचा ‘आशीर्वाद’ नसता तर अशोक गेहलोत कधीच मुख्यमंत्री झाले नसते. या दाव्यांनंतर त्यांची विधानसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube