सरकारी काम अन् अर्धा तास थांबणं भोवलं; न्यायालयाने पोलिसांना दिली गवत कापण्याची शिक्षा
Court Punishment To Police : सरकारी कामांमध्ये अनेकदी दिरंगाई होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सरकारी कामांत दिरंगाई केल्याने अनेकदा कारवाईदेखील झाल्याचं समोर आलेलं आहे. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. पोलिस आरोपींंना घेऊन न्यायालयात अर्धा तास उशिराने पोहोचले. त्यावरुन परभणी न्यायालयाने शिस्तभंग केल्याचा ठपका ठेऊन पोलिसांना परिसरातील गवत कापण्याची शिक्षा दिली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेमधील कर्मचाऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी गवत कापण्याची शिक्षा देण्यात आल्याची माहिती खुद्द पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांनी दिली आहे.
चक्का जाम होणार! ‘पोलिसांना गुंगारा देऊन आंदोलनाला या’ : ऊसदरासाठी राजू शेट्टी ठाम
नेमकं काय घडलं?
मानवत पोलिस ठाण्याच्या अधिपत्याखाली दोन पोलिस कर्मचारी रात्रीच्या वेळी गस्त घालत होते. मानवत परिसरात गस्त घालत असताना पोलिस कर्मचाऱ्यांनी दोन जण संशयास्पद अवस्थेत फिरत असल्याने ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या दोघांना दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता सुट्टीकालीन न्यायालयात हजर करायचं होतं, मात्र, दुसऱ्या दिवशी पोलिस दोघांना घेऊन न्यायालयात 11 : 30 वाजता पोहोचले होते.
पोलिस कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिर झाल्याचं निदर्शनास आलं. न्यायालयाने पलिसांना न्यायालय परिसरात गवत कापण्याची शिक्षा देण्याचे दिले आहेत. न्यायालयाने उशिर झाला म्हणून पोलिसांना अशी शिक्षा दिल्याने कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं. त्यानंतर सरकारी दफ्तरमध्ये यासंदर्भात अधिकृतपणे नोंद करण्यात आली आहे. तसेच तपशीलानूसार विभागातील उच्चपदस्थांना अहवालही पाठवण्यात आला.
‘पनौती’मुळे भारताचा पराभव; राहुल गांधींचा पीएम मोदींवर हल्लाबोल, भाजपकडून प्रत्युत्तर
या प्रकरणाबद्दल माहिती देताना पोलिस अधीक्षक यशवंत काळे म्हणाले, आमच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, हवालदारांच्या जबाबासह सविस्तर अहवाल योग्य कारवाईसाठी न्यायव्यवस्थेकडे पाठवण्यात आला असल्याचं सांगितलं आहे.
Operation Silkyara : बोगद्यातील मजुरांचा पहिला व्हिडीओ समोर; पाहा त्यांची प्रकृती कशी आहे?
दरम्यान, या घटनेचे साक्षीदार असलेल्या अन्य तीन हवालदारांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. मानवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी डायरीतील नोंदीला दुजोरा दिला आहे, मात्र अधिक तपशील देण्यास नकार दिला.