Operation Silkyara : बोगद्यातील मजुरांचा पहिला व्हिडीओ समोर; पाहा त्यांची प्रकृती कशी आहे?
Operation Silkyara : उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशीमध्ये सिलक्यारा बोगदा (Operation Silkyara) कोसळल्याने 41 मजूर 10 दिवसांपासून अडकले आहेत. तब्बल 192 तासांच्या प्रयत्नानंतर मजूरांसाठी अन्न पाठवण्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना अन्न पाठवण्यासाठी छोटा पाईप ड्रिल करण्यात आला आहे. त्यात अन्नासोबत कॅमेरा देखील आत सोडण्यात आला आहे. त्यामुळे या कामगारांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.
‘कुणी देवाकडे केली प्रार्थना तर…’; भारताच्या पराभवानंतर ‘या’ कपलने टीम इंडियाला केला सपोर्ट
बोगद्यातील मजुरांचा पहिला व्हिडीओ समोर…
या मजुरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यात त्यांना जिवंत राहण्यासाठी अन्न-पाणी पाठवण्यासाठी छोटा पाईप ड्रिल करण्यात आला आहे. त्यात अन्नासोबत एनएचआयडीसीएलने मजुरांना पाहण्यासाठी दिल्लीवरुन एंडोस्कोपिक कॅमेरे मागवले आहेत. हे कॅमेरे आज मंगळवारी पाईपद्वारे बोगद्यात पाठवण्यात आले. त्यामुळे कामगारांना कॅमेऱ्यांद्वारे पाहता आलं आहे, कामगारांची स्थिती अधिक जवळून पाहता आणि समजून घेता आली आहे.
VIDEO | First visuals of workers stuck inside the collapsed Silkyara tunnel in #Uttarkashi, Uttarakhand.
Rescuers on Monday pushed a six-inch-wide pipeline through the rubble of the collapsed tunnel allowing supply of larger quantities of food and live visuals of the 41 workers… pic.twitter.com/mAFYO1oZwv
— Press Trust of India (@PTI_News) November 21, 2023
दरम्यान या समोर आलेल्या पहिल्या व्हिडीओमध्ये हे कामगार दिसून आले आहेत. त्यांच्याशी वॉकी टॉकीच्या माध्यमांतून संवाद साधण्यात आला. त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न एनएचआयडीसीएलच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच त्यांना कॅमेऱ्याजवळ जाऊन माईकजवळ बोलण्यास सांगितलं गेलं आहे. जेणेकरून त्यांचा आवाज आणि स्थिती कशी आहे. हे समजणार आहे. त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
IND vs AUS Final : ऑस्ट्रेलिया जिंकला पण वॉर्नरनं मागितली माफी; नेमकं काय घडलं ?
दरम्यान, 192 तास उलटले तरीही मजुरांची अद्यापही सुटका होत नसल्याने नातेवाईकांकडून आक्रोश करण्यात येत आहे. जसेजसे जास्त दिवस उलटत आहेत. तसतसं मजुरांचं मनोधैर्य खचत असून आमची लवकर सुटका करा, अशी मजुरांकडून मागणी करण्यात येत आहे. तर सर्व प्रयत्नांमध्ये आता सोमवारी विदेशातून देखील टनल एक्सपर्टला यावर पर्याय सुचवण्यासाठी पाचारण करण्यात आलं आहे. त्यामुळे आता हे मजूर कशी बाहेर पडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.