Download App

‘2 मिनिटाच्या सीनसाठी किंग खानने घालवलेत तब्बल 6 तास; ‘डंकी’बद्दलची चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shah Rukh Khan Dunki Movie Shooting : शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (Dunki Movie) किंग खानने (Shah Rukh Khan ) बॅक टू बॅक दोन ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आहेत. (Shah Rukh Khan Dunki Movie Shooting) आणि आता त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. आता चाहते त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.


या चित्रपटात अभिनेता अजय कुमार महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. एका मुलाखतीच्या दरम्यान अजयने सांगितले की, किंग खानने अनेक तास मेहनत घेतली आणि चार ओळींचा शॉट देण्यासाठी अनेक टेक घावे लागले आहे. हा सर्व प्रयत्न शाहरुख खानला हा शॉट परफेक्ट करायचा होता म्हणून परत परत घ्यावा लागला आहे.

अजय कुमार यांनी डीबीशी केलेल्या संभाषणात सांगितले की, “विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, आमचा एक सीन फक्त 2 मिनिटांचा आहे. पण तो सीन पूर्ण करण्यासाठी शाहरुख खानने तब्बल 6 तास मेहनत घेतली आहे. सायंकाळी 7 वाजेपर्यंत शूटिंग केले.

शूटिंगदरम्यान कुमारने सांगितले की, शाहरुखने माझ्यासोबत या सीनची 20-25 मिनिटे तालिमदेखील केली आहे. 25 वेगवेगळ्या व्हेरिएशनचा हा सीन आहे. हा सीन शूट होईपर्यंत सहा तास किंग खान त्यावर खूप मेहनत घेत होते, तेव्हाही तो रिहर्सल करत होता. तेही जेव्हा त्याला फक्त सोप्या ओळी बोलायच्या होत्या.

‘योद्धाच्या भूमिकेत दिसणार सुबोध भावे, त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओतील पात्राने वेधलं लक्ष

अजयने सांगितले की, शाहरुख खानने हा सीन किमान 25 वेगवेगळ्या व्हेरिएशनमध्ये केला आहे. त्याननी पुढे सांगितले की हा सीन करण्यासाठी शाहरुख खानला किमान 6 तास आरामात करताना दिसला नाही. त्याच्या सहकलाकारांना जितके स्वातंत्र्य देतो तितकेच तो स्वतःला घेत असतो. शाहरुख खानचा ‘डंकी’ हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Tags

follow us