Dunki Teaser Release date: किंग खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळणार खास गिफ्ट

Dunki Teaser Release date: किंग खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळणार खास गिफ्ट

Dunki Teaser Release Date: शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका किंग खान त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘डंकी’मुळे (Dunki Movie ) सध्या जोरदार चर्चेत आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे, त्याने चाहत्यांना मोठं गिफ्ट दिल आहे. या चित्रपटाचा टीझर शाहरुख खानच्या वाढदिवसाला प्रदर्शित होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. म्हणजेच 2 नोव्हेंबरला या सिनेमाचा भव्य टीझर लाँच (Dunki Teaser Release) करण्यात येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sumit Kadel (@sumitkadelofficial)


एवढेच नाही तर चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनीही किंग खानच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किंग खान स्वत: ‘डंकी’ या सिनेमाचं टीझर लॉन्च करणार आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या टीझरला यू सर्टिफिकेट दिले आहे. या चित्रपटाचे दोन टीझर रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शाहरुख खानचा ‘डंकी’ हा सिनेमा त्याच्या ‘जवान’ आणि ‘पठाण’ या चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे. किंग खानचा अॅक्शन अवतार ‘डंकी’मध्ये दिसणार आहे,प्रेक्षकांना असे काही दाखवण्यात येणार आहे, जे यापूर्वी कोणत्याही चित्रपटात बघायला मिळाले नाही.

‘द टायगर इफेक्ट’ बॉक्स ऑफिसवर गणपत पलिकडे जाणारा टायगर श्रॉफचा अनोखा प्रवास!

शाहरुख खानसोबत या सिनेमात अभिनेत्री तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात विकी कौशल कॅमिओ करताना दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि ज्योती देशपांडे करत आहेत. यशराज फिल्म्सने या चित्रपटाची निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube