Shah Rukh Khan: अखेर किंग खान भारतामध्ये परतला! अपघातानंतर मुंबई विमानतळावर झाला स्पॉट
Shah Rukh Khan: अमेरिकेमध्ये शाहरूख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका किंग खानचा (King Khan) एका सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान गंभीर दुखापत झाले असून त्याच्या नाकावर शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या चर्चांमध्ये बुधवारी पहाटे मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) किंग खान स्पॉट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या नाकावर कोणतेही बॅन्डेज, खुणा दिसून आलेल्या नाहीत.
View this post on Instagram
कॅज्युअल लूकमध्ये किंग खान सुस्थितीत अमेरिकेतून (America) मुंबईत परतला असल्याचे चित्र बघून अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. किंग खानसोबत त्याचा लेक आणि पत्नी देखील आले आहेत. दरम्यान किंग खानने विमानतळावर मीडीयाशी प्रकृतीविषयी कोणतेही अपडेट देणं टाळलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार किंग खान एमिरेट्स फ्लाइटने भारतात परत आला आहे. ही फ्लाइट दुबईहून थेट मुंबईमध्ये येत असते. किंग खान मुंबई विमानतळावर येताच त्याला अनेक चाहत्यांनी घेरले होते.
किंग खानच्या तब्येतीची विचारपूस केली असता, त्याने उत्तर देणं टाळलं आहे. मोठ्या घाईघाईनं तो विमानतळावरून निघाला आहे. विमानतळावर स्पॉट झालेल्या किंग खानने निळ्या रंगाची हुडी आणि कॅप कॅरी केली होती. किंग खान हा दमलेला असला तरी फिट असल्याचे दिसत होता. त्याला बघून त्याच्या चाहत्यांच्या जीव भांड्यात पडला आहे. याअगोदर देखील किंग खानला शुटींगच्या दरम्यान अशा प्रकारची अनेकदा दुखापत झाली होती.
Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
२०१३ मध्ये आलेल्या चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाच्या शुटींगच्या वेळी किंग खानच्या ८ सर्जरी झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर २०१७ मध्ये किंग खान रईस शुटींगवेळी जखमी झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर आणि गुडघ्यांवर चांगलीच इजा झाल्यामुळे त्याची सर्जरी करावी लागली होती. किंग खानचा ‘जवान’ हा सिनेमा ७ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. त्यानंतर भाईजानच्या ‘टायगर 3’ सिनेमात किंग खान दिसून येणार आहे. तर २०२४ मध्ये किंग खान आणि भाईजानच्या ‘टायगर वर्सेस पठाण’ सिनेमाचं शुटींग सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.