Download App

Ekda Yeun Tar Bagha या सिनेमातील शार्प शूटर विशाखाचा रावडी लूक पाहिलात का?

Vishakha Subhedar New Look: अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar ) सध्या ते बेधडक आणि डॅशिंग अंदाजामुळे सतत चर्चेत येत आहे. हातात गन घेतलेलं तिची वेशभूषा पाहता एखाद्या खलनायकाची अथवा ‘शूटर’ ची व्यक्तिरेखा त्या साकारताना दिसत आहे. (Marathi Movie) तिचा हा ‘शूटर’ अंदाज आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटातला आहे. या चित्रपटात विशाखाने ‘मगरु’ या ‘शार्प शूटर’ ची भूमिका साकारली असून यात त्या ‘डॅशिंग रावडी लूक’ मध्ये दिसणार आहेत.


या भूमिकेबद्दल बोलताना विशाखाने सांगितलं की, ही अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं त्या सांगतात. येत्या 24 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे.

विशाखा सोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार, आदि चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे. विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करत आहे.

‘एकदा येऊन तर बघा’ या सिनेमाचा दमदार टीझर नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला. 1 मिनिटं 4 सेकंदाच्या टीझरमध्ये चाहत्यांना कलाकारांच्या भूमिका आणि कथानकाबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. गिरीश कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंबीय एका नव्याकोऱ्या हॉटेलची सुरूवात करत असल्याचे बघायला मिळत आहे. पात्रांची नावं टीझरमध्ये उघड करण्यात आली नाहीत.

Veer Savarkar Secret Files’ या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगला सुरुवात

‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे. चित्रपटाची कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. गीते मंदार चोळकर यांची असून रोहन-रोहन, कश्यप सोमपुरा यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. कार्यकारी निर्माते मनोज अवाना तर लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत.

Tags

follow us