Veer Savarkar Secret Files’ या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगला सुरुवात

Veer Savarkar Secret Files’ या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगला सुरुवात

Veer Savarkar Secret Files: ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित पहिल्या वेबसीरिजच्या (Web Series) शूटिंगला सुरुवात भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर (Social media) करण्यात आला आहे. यावेळी या वेबसीरिजचे (Hindi Web Series) लेखक दिग्दर्शक योगेश सोमण (Yogesh Soman) , निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. अनिर्बान सरकार, डेक्कन ए व्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे, प्रॉडक्शन हेड साची गाढवे, सिनेमॅटोग्राफर प्रसाद भेंडे, प्रोडक्शन डिझायनर, सिद्धार्थ तातूसकर,कला दिग्दर्शक महेश कोरे आदी उपस्थित होते.

दरम्यान दिग्दर्शक योगेश सोमण यांनी सांगितले आहे की,” सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासहित देशकार्यासाठी अर्पण केले आहे. त्यामुळे त्यांचे कार्य समाजासमोर येणं खूप महत्वाचं असणार आहे, असे आम्हाला वाटते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देणे हे आमचे नॅरेटिव्ह नसून ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या वेबसीरिजच्या माध्यमातून इतिहासाला अवगत असणारे, ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत. जे पुरावे तार्किक दृष्टीने मांडता येणार आहेत आणि त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व जसे आहे, तसे मांडण्याचा आमचा छोटासा प्रयत्न राहणार आहे

सावरकर यांचे जीवन हा जवळपास १०० वर्षांचा इतिहास असणार आहे. या सिनेमातून लोकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, लोकांचे गैरसमज दूर व्हावे. राजकीय, सामाजिक स्वार्थांसाठी तयार केले जाणारे नॅरेटिव्ह पुसले जावे, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त सावरकर यांचे कुणीही गुरु नव्हते. सावरकर जन्मतः नेते होते. एकलव्यासारखी त्यांची वाटचाल आहे. ‘सिक्रेट फाईल्स म्हणजे सावरकरांचे व्यक्तिमत्व जे लोकांना माहित नाही ते अनफोल्ड करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न राहणार आहे.

तसेच पुढे बोलताना सोमण म्हणाले की, आजपर्यंत सावरकर यांच्यावर जीवनावर आधारित नाटक, चित्रपट आले आहेत. परंतु वेब सीरिजच्या माध्यमामध्ये पहिल्यांदाच ही मालिका समोर येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित हिंदी भाषेतील चार सीझनमध्ये ही वेबसिरीज राहणार आहे. पहिल्या सिझनमध्ये सावरकर यांच्या जन्मापासून म्हणजे १८८३ ते मार्सेलिस येथे समुद्रात उडी मारण्यापर्यंतचा कालखंड बघता येणार आहे.

Naal 2: ‘नाळ भाग 2′ चित्रपटातील ‘भिंगोरी’ पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

डॉ. अनिर्बान सरकार म्हणाले की, ” सावरकर हे जन्मतः क्रांतिकारी होते. त्यांचे खरेखुरे व्यक्तिमत्व समाजासमोर आण्याची खूप गरज होती. कारण सेल्युलर जेल, कोलू ओढला, त्यांनी बोटीतून मारलेली उडी एवढेच लोकांना माहित आहे. परंतु स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान, त्यांनी केलेला त्याग यांच्याबद्दलचे वास्तव कुणालाच माहिती नाही. त्यांचे जीवनकार्य संपूर्ण देशाला माहित व्हावे, यासाठी हिंदी भाषेत ही वेबसिरीज असणार आहे. लोकांनी या वेब सीरिजला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि सावरकर समजून घ्यावेत अशी अपेक्षा यातून राहणार आहे. सावरकर यांच्या जीवनावर आधारित कलाकृती सादर करावी, हे माझे स्वप्न होते. ते या वेब सीरिजच्या माध्यमातून पूर्ण होणार असल्याची अशा व्यक्त केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube