Bigg Boss OTT 2चे दुसरे पर्व ठरले ऐतिहासिक; एल्विश यादव रेकॉर्ड ब्रेक करत रचला इतिहास!

Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav : बॉलिवूडचा भाईजानच्या (‘Salman Khan) ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. यामध्ये एल्विश यादव याने (Elvish Yadav) बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपल नाव कोरलं आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे चाहत्यांचे चांगलेच लक्ष लागले होते. एल्विश यादव आणि […]

Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav

Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav

Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav : बॉलिवूडचा भाईजानच्या (‘Salman Khan) ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. यामध्ये एल्विश यादव याने (Elvish Yadav) बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपल नाव कोरलं आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे चाहत्यांचे चांगलेच लक्ष लागले होते. एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान (Abhishek Malhan) उर्फ फुकरा इंसान या दोन स्पर्धकांमध्ये शेवटची लढत बघायला मिळाली आहे. अखेर एल्विशने याने बाजी मारली आहे.

‘बिग बॉस ओटीटी 2’च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये एल्विश यादव, अभिषेक मल्हान, मनीषा रानी, बेबिका धुर्वे आणि पूजा भट्ट या ५ स्पर्धकांचा समावेश होता. यामध्ये एल्विश आणि अभिषेकमध्ये चुरशीची स्पर्धा रंगल्याचे बघायला मिळाले आहे. दोघेही युट्यूबर्स असल्याने दोघांचा देखील चाहतावर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. अभिषेकला १८.७ मिलियन आणि एल्विशला २१.९ मिलियन वोट्स मिळाले असल्याचे बघायला मिळाले आहे.


‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता होणाऱ्या एल्विशला २५ लाख रुपये आणि ‘बिग बॉस’ची चमकती ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. एल्विशने ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. गेल्या काही दिवसापासून वाइल्ड कार्ड स्पर्धक बिग बॉसचा विजेता होत नव्हता. परंतु एल्विशने १७ वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक करत एक अनोखा इतिहास रचला आहे. तसेच या पर्वाचा अभिषेक मल्हान पहिला रनरअप आणि मनीषा रानी दुसरा रनरअप हरल्याचे बघायला मिळाले आहे. ‘बिग बॉस ओटीटी 2’चा महाअंतिम सोहळा मनोरंजनात्मक असल्याचे बघायला मिळाला होता.

New Jersey : अभिनेत्री तमन्ना भाटिया ‘इंडिया डे परेड’मध्ये ग्रॅंड मार्शल म्हणून चमकली!

एल्विश यादव हा नेमका कोण?

एल्विश यादव हा एक लोकप्रिय युट्यूबर आहे. युट्यूबच्या माध्यमातून त्याला एक आपली वेगळी क्रेझ निर्माण केली आहे. २५ वर्षीय एल्विश हा मुळचा गुरुग्रामचा राहणारा आहे. दिल्ली मधील हंसराज महाविद्यालयातून त्याने शिक्षण घेतले आहे. ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये धमाकेदार वाइल्ड कार्ड एन्ट्री करत त्याने सर्वांचं लक्ष वेधल्याचे बघायला मिळाले आहे. तसेच ‘एल्विश यादव व्लॉग्स’ असे त्याच्या चॅनलचे नाव आहे. एल्विशला महागड्या, आलिशान गाड्यांची आवड असल्याचे बघायला मिळत आहे.

Exit mobile version