Download App

Imran Hashmi ‘टायगर ३’ मधील सीन्स कापल्याने सुप्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा, म्हणाला…

Imran Hashmi: बॉलिवूड भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा ‘टायगर ३’ (Tiger 3) सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट बघत होते. नुकताच निर्मात्यांनी ‘टायगर ३’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या ट्रेलरमध्ये चाहत्यांना भाईजानसोबत कतरिनाचा अ‍ॅक्शन लूक बघायला मिळाला आहे. यासोबत इम्रान हाश्मीची (Imran Hashmi) देखील एक झलक बघायला मिळाली आहे.

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये इम्रान हाश्मीला फारसा स्क्रीन टाइम न मिळाल्याने त्याचे चाहते नाराज झाल्याचे बघायला मिळत आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी याविषयी भाष्य करायला सुरुवात केली आहे. यामुळे एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने इम्रानचे सिनेमातील काही सीन्स कापले गेले असल्याचा खळबळजनक आरोप देखील करत आहेत.

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि स्वयंघोषित समीक्षक कमाल आर खान म्हणजेच आदित्य चोप्राने याबद्दल भाष्य केले आहे. त्याने सांगितले आहे की, “आपले बरेच सीन्स कट केल्याचा अन् फसवणुकीचा आरोप इम्रानने यश राज फिल्म्सवर केला आहे. गेल्या वर्षभर इम्रान या सिनेमासाठी खूप मेहनत घेतला आहे. या चित्रपटामुळे आपल्या लोकप्रियतेमध्ये अधिक वाढ होणार असा त्याचा समज होता. परंतु आता ‘टायगर ३’मध्ये इम्रानचे काही सीन्स कट केल्याचा आरोप केला आहे.

समलिंगी विवाहाला सुप्रीम कोर्टाचा नकार, करण जोहरच्या ‘त्या’ विधानाची होतीय चर्चा

अद्याप इम्रानकडून याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण किंवा अधिकृत वक्तव्य त्याने केले नाही. तसेच यश राज फिल्म्सकडून देखील याबद्दलची पुष्टी झाली नाही. ‘टायगर ‘यशराज फिल्म्स’च्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधला पाचवा सिनेमा असणार आहे. ‘टायगर ३’मध्ये भाईजानसोबत कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. या सिनेमात इम्रान हाश्मीने खलनायकाची भूमिका साकारली आहे. याचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. १० नोव्हेंबर २०२३ या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Tags

follow us