‘देवघर ऑन रेंट’मध्ये ‘केजीएफ’फेम गरुडा रामची एन्ट्री… 25 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मराठी चित्रपटांच्या प्रवाहात सामील होण्यासाठी भारतातील इतर प्रादेशिक सिनेसृष्टीतील कलाकार-तंत्रज्ञही उत्सुक असल्याचे नेहमी पाहायला मिळते.

Untitled Design   2026 08 29T181810.653

Untitled Design 2026 08 29T181810.653

Entry of ‘KGF’ fame Garuda Ram in ‘Devghar on Rent’ : दिवसेंदिवस मराठी चित्रपट ग्लोबल होणे ही कोणत्याही मराठी माणसासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. जागतिक पातळीवर नावलौकीक मिळवणाऱ्या मराठी चित्रपटांच्या प्रवाहात सामील होण्यासाठी भारतातील इतर प्रादेशिक सिनेसृष्टीतील कलाकार-तंत्रज्ञही उत्सुक असल्याचे नेहमी पाहायला मिळते. अनोखे शीर्षक आणि विषयामुळे चर्चेत आलेल्या दिग्दर्शक स्वरूप सावंत दिग्दर्शित ‘देवघर ऑन रेंट’ या मराठी चित्रपटातही दाक्षिणात्य कलाकार-तंत्रज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 25 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह बेळगांव, हैद्राबाद, इंदौर, बडोदा येथे प्रदर्शित होणार आहे.

आनंदी पिक्चर्स अमरावती प्रस्तुत आणि राधाकृष्ण प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील आहेत. सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी ‘देवघर ऑन रेंट’चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची संकल्पना पूनम चौधरी पाटील यांची असून कथा-पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे.

नुकतीच या चित्रपटाबाबतची महत्त्वाची माहिती रिव्हील करण्यात आली आहे. या चित्रपटात श्रवण राघवेंद्र आणि ‘केजीएफ’फेम अभिनेता गरुडा राम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘देवघर ऑन रेंट’ या शीर्षकानुसार या चित्रपटात आध्यात्माची सांगड घातलेली कथा पाहायला मिळणार असली तरी त्याला दमदार अॅक्शनचीही जोड देण्यात आली आहे. अॅक्शनच्या बाबतीत भारतीय सिनेसृष्टीत दाक्षिणात्य चित्रपट उजवे मानले जातात. मागील काही वर्षांमध्ये हिंदी भाषिक प्रेक्षकांनीही दाक्षिणात्य शैलीतील अॅक्शनवर प्रेम केले आहे.

नेपाळमध्ये पुराच्या पाण्यात वाहून आलेली बँकेची तिजोरी लुटली, आतापर्यंत 29 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

आता ही अॅक्शन ‘देवघर ऑन रेंट’च्या निमित्ताने मराठी चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. ‘पुष्पा’फेम अॅक्शन मास्टर कार्तिक डंगरी यांनी अॅक्शन मास्टर म्हणून काम पाहिले आहे. खुर्चीला खिळवून ठेवणारी अॅक्शनदृश्ये या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरणारी आहेत. यासाठी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोलामोलाच्या निर्मितीमूल्यांचा समावेश करण्यात आला आहे.

दमदार अॅक्शन ही या चित्रपटाच्या कथेची गरज होती. चित्रपटात जे सादर करायचे ते प्रेक्षकांचे परिपूर्ण मनोरंजन करणारे असावे या भावनेतून धडाकेबाज अॅक्शन्सचा समावेश करण्यात आला असल्याचे निर्माते सचिन रोडे पाटील म्हणाले. याबाबत दिग्दर्शक स्वरूप सावंत म्हणाले की, केवळ रसिकांचे लक्ष वेधण्यासाठी दाक्षिणात्य अॅक्शन मास्टर कार्तिक डंगरी यांची निवड करण्यात आलेली नाही. त्यांचे काम पाहून रसिकही खुश होतील. नाट्यमय घडामोडींचा समावेश असलेल्या पटकथेतील अॅक्शन रसिकांना खिळवून ठेवेल.

गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र यांनी दक्षिणेकडे खूप काम केले असून, लोकप्रियही आहेत. या चित्रपटात दोन महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांच्यासारख्या मातब्बर कलाकारांची आवश्यकता होती. दोघांनीही आमचा विश्वास सार्थ ठरवला आहे. हा चित्रपट आध्यात्माची वर्तमानाशी सांगड घालणारा आहे. आजची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटातील आध्यात्माचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असल्याचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी स्पष्ट केले.

FDAला मुंबई हायकोर्टाचा दणका; सिप्लाचा औषध विक्री परवाना रद्द करण्याचा निर्णय मागे

‘देवघर ऑन रेंट’ या चित्रपटात निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चवरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, सिद्धेश्वर झाडबुके आणि गौतमी पाटील आदी कलाकार आहेत. संगीतकार एस. सागर आणि कबीर शाक्य यांनी या चित्रपटातील अर्थपूर्ण गीतांना सुमधूर स्वरसाज चढवला असून, कोरीओग्राफी किशोर दळवी यांनी केली आहे. डिओपी चैतन्य साळुंखे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, रोहित नागभीडे यांनी पार्श्वसंगीत केले आहे.

कला दिग्दर्शनाचे काम दिलीप कंधारे यांनी पाहिले आहे. वेशभूषा अपेक्षा गांधी सोनी यांनी, तर रंगभूषा सुजीत सुरवसे यांनी केली आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते अनुनेहा घोडके आणि निर्मिती व्यवस्थापक यश सणस आहेत. अक्षय लोणदे यांनी सिंक साऊंड, शर्मा यांच्या टिमने प्रकाश योजना आणि विजय म्हस्के यांनी प्रॉडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे.

Exit mobile version